Weight Loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी व्यायाम कि डान्स चांगले? वाचा सविस्तर

काही संशोधनात असे आढळून आले आहे की वजन कमी करण्यासाठी डान्स हे एक प्रभावी उपाय असू शकते.

Puja Bonkile

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा योगा करण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेक लोक नियमितपणे ते करू शकत नाही. काही संशोधनात असे आढळून आले आहे की वजन कमी करण्यासाठी डान्स हे एक प्रभावी उपाय असू शकते. शिवाय, व्यायाम करण्यापेक्षा डान्स करण्यात जास्त मजा येते.

संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक डान्स करत नाहीत त्यांच्यापेक्षा कमी शरीरात चरबी असते. यासाठी, डान्सचा कोणताही विशेष प्रकार नाही, परंतु तुम्ही भांगडा, झुंबा, पारंपारिक नृत्य, एरोबिक्स , काहीही तुमच्या रूटिनमध्ये समावेश करू शकता. आठवड्यातून 5 दिवस डान्ससाठी सुमारे 40 ते 90 मिनिटे काढावे. तुम्ही फक्त 2 ते 3 महिन्यांत बऱ्यापैकी वजन कमी करू शकता.

डान्स हा उत्तम व्यायाम का आहे?

सर्वात मोठे कारण म्हणजे ते कंटाळवाणे नाही आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ट्रेनिंगची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट प्ले करून फक्त डान्स सुरू करू शकता. काही लोक व्यायाम करायला कंटाळा करतात पण डान्सकडे लोकांचा असा दृष्टिकोन क्वचितच पाहायला मिळतो. संशोधकांनी सांगितले की आनंददायक शारीरिक अॅक्टिव्हिटीज देखील मूड सुधारतात आणि तणाव कमी करतात. याचा अर्थ, डान्स केल्याने शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते.

कोणता डान्स प्रकार फायदेशीर आहे ?

तुम्ही हिप-हॉप आणि झुंबा डान्स प्रकार निवडू शकता. डान्स केल्याने तुम्हा कमी खर्चात वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासोबतच डान्समुळे स्नायूंची ताकद वाढण्यास, संतुलन निर्माण करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. काही डान्स स्टेप्सच्या मदतीने तुम्ही पोटाची चरबीही कमी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT