Weight Loss
Weight Loss  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Tips: 'या' 5 गोष्टी केल्या तर तुमचे वजन नक्की होईल कमी

दैनिक गोमन्तक

Weight Loss Tips: आजच्या बदलत्या जीवनशैलित अनेकांना वाढत्या वजनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. फास्टफूड, चौरस आहाराची कमतरता आणि शरीराची कमी हालचाल या सगळ्याचा परिणाम म्हणून वजन वाढायला सुरुवात होते.

अनेकांना वजन वाढल्यामुळे इतर आजारांना मधूमेह, हृदयविकार अशा आजारांना सामोरे जावे लागते आणि ही समस्या मोठी बनते. त्यामुळे वेळीच वाढत्या वजनाला आवर घातला तर तुम्हाला भविष्यात कमी त्रास होतो. चला तर जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होईल.

१. दररोज व्यायाम करा

तुमचे रोजचे काम बैठे असेल तर तुमच्या शरीराची हालचाल कमी होईल आणि तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुमच्या व्यस्त दीनचर्येत व्यायामाचा समावेश करा. वीस मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे ठरते. तुम्ही जर चालणे, योगासने, धावणे अशा वेगवेगळ्या व्यायामप्रकारांचा समावेश करु शकता.

२. आहार

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही दररोज १०० ग्रॅम फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वजन लवकर कमी होते. फळे, पालेभाज्या याचाही समावेश तुमच्या रोजच्या आहारात होणे महत्वाचे आहे. याबरोबरच काळे बीन्स नियमितपणे खाणे सुरू करा. काळे बीन्स फायबरचे समृद्ध स्त्रोत आहेत. वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते.

3. पुरेशी झोप घ्या

तुम्ही कशाप्रकारची झोप घेता त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. झोप तुमच्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असते.

कमी झोप घेतल्याने तुमची चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे शरीरात चरबी वेगाने जमा होते. त्यामुळे रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे महत्वाचे आहे.

4. मानसिक आरोग्य जपा

तुमच्या मानसिक आरोग्याचादेखील तुमच्या शारिरावर मोठा परिणाम होत असतो. तुम्ही हा अनुभव नक्की घेतला असेल जर तुम्ही नैराश्याच्या काळात तुमचे वजन वेगाने वाढते. त्यामुळे ताणतणावाचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान, प्राणायम करू शकता. यासोबतच तुमच्या तज्ञांचीदेखील मदत घेऊ शकता.

5. आंतरिक प्रेरणा

वाढलेले वजन कमी करणे एका दिवसाचे काम नाही. तर तुम्हाला त्यासाठी सातत्य राखावे लागते. तुमच्या आहार, व्यायाम यामध्ये तुम्ही सातत्य दाखवले तरच त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी आंतरिक प्रेरणा असणे महत्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT