Benefits of Drinking Amla Juice: रोज सकाळी आवळा खाल्यास अनेक फायदे होतात.तुम्ही घरातील मोठ्या लोकांकडून देखील हे ऐकले असेलच. आवळ्यामध्ये खनिजे आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात.
आवळ्याचा ज्युस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हा ज्युस नियमितपणे पिल्यास वजन कमी होण्यासह अनेक शारिरिक फायदे होतात.
ब्लॅकहेड्स
जर तुम्ही ब्लॅकहेड्सने त्रस्त असाल आणि या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही आवळा ज्सुसचे पिऊ शकता. आवळ्याच्या ज्युसतचे सेवन केल्याने ब्लॅकहेड्सच्या समस्या कमी होतात.
वृद्धत्व कमी होते
आवळ्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. यामुळे वृद्धत्वाची समस्या देखील कमी होते. आवळ्याचा ज्युस पिल्याने त्वचा चमकदार राहते.
पिंपल्स
जे लोकाच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्या लोकांनी आवळ्याचा आहारात समावेश करावा. आवळ्याच्या ज्युसने केवळ पिंपल्सपासून रक्षण होत नाही तर मुरूम देखील कमी होतात.
दृष्टी वाढण्यासाठी
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. ते अंधत्व आणि मॅक्युलर डिजेनेरेशन सारख्या डोळ्यांशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात.
रक्तप्रवाह सुधारतो
आवळ्याच्या रसामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरच्या जखमाच नाही तर जळजळ देखील कमी होते. आवळ्याचा रस पिल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे हृदयाचे देखील आरोग्य देखील चांगले राहते.
हायपरपिग्मेंटेशन
हायपरपिग्मेंटेशनची समस्या असेल तर तुम्ही नियमितपणे आवळा ज्युसचे सेवन केले पाहिजे. आवळ्याच्या ज्युसमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे हायपरपिग्मेंटेशनचे लक्षण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
केस मजबुत
आवळा खाणे आरोग्यासाह केसांच्या आरोग्यासाठी देकील फायदेशीर असते. जर तुमचे केस गळत असेल किंवा पांढरे होत असेल तर आवळा ज्युसचे नियमितपणे सेवन करावे.
वजन कमी
रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्युस पिल्यास पचनक्रिया चांगली राहते. ते कॅलरीज जलद बर्न करण्याचे काम करते. हे चयापचय गतिमान करते. हे जलद वजन कमी करण्यास मदत करते.
त्वचेसाठी फायदेशीर
आवळा ज्युस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुम आणि डाग दूर करण्यात मदत होते. तसेच केस मजबूत होण्यास मदत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.