Paratha For Weight Loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Paratha For Weight Loss: काय सांगता? आता पराठा खाऊनही कमी होऊ शकतं वजन! आरोग्य तज्ज्ञ म्हणतात....

कॅलरीजच्या बाबतीत, एका पराठ्यात 70-80 कॅलरीज असतात

दैनिक गोमन्तक

Paratha For Weight Loss: तुम्हालाही वजन कमी करायचे आहे, पण जेवण सोडायचे नाही आणि तुमच्या घरचे तेच तूप आणि बटरचे पराठे खायचे आहेत का? मग ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला पराठे खाऊनही वजन कसे कमी करता येऊ शकते ते सांगणार आहोत.

पराठा खाणे आरोग्यदायी : आरोग्य तज्ज्ञ

खरं तर, कॅलरीजच्या बाबतीत, एका पराठ्यात 70-80 कॅलरीज असतात, तर दोन पाचक बिस्किटांमध्ये 140 कॅलरीज असतात. बिस्किटमध्ये फक्त कॅलरीज असतात, तर पराठ्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि निरोगी चरबी असतात आणि ही एक सोपी रेसिपी आहे जी तुम्ही वेळेत बनवू शकता. टिफिनमध्ये किंवा नाश्त्यात केव्हाही खाऊ शकता.

हेल्दी पराठा कसा बनवायचा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही पराठ्यामध्ये फायबर युक्त भाज्या भरू शकता. त्यात मुळा घालता येतो, त्यात कॅलरीज खूप कमी असतात. प्रोटीनसाठी टोफू किंवा पनीरचे स्टफिंग करता येते.

याशिवाय गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ग्लूटेन फ्री पीठ देखील निवडू शकता, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते. याशिवाय पराठा बेक करण्यासाठी रिफाइंड तेलाऐवजी तूप वापरावे, कारण त्यात हेल्दी फॅट्स आढळतात आणि तुम्ही बिनदिक्कत एक ते दोन पराठ्यांचा आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

SCROLL FOR NEXT