rise cheese cutlet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weekend Special: रात्रीचा भात उरला असेल तर नाश्त्यात बनवा टेस्टी राईस चीज कटलेट, नोट करा रेसिपी

विंकेडला नाश्त्यासाठी तुम्ही रात्री उरलेल्या भातापासून स्वादिष्ट कटलेट बनवू शकता.

Puja Bonkile

Weekend Special Recipe: विंकेडला नाश्तात काही तरी हटके खावेसे वाटते.असा वेळी अनेक नव्या रेसिपींचा शोध घेतला जातो. अनेक वेळा रात्रीचा भात उरतो. हा भात टाकून न देता तुम्ही स्वादिष्ट चीज राईस कटलेट बनवू शकता. तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

  • चीज राईस कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 वाटी उरलेला भात

1/2 वाटी कॉर्न

2 चमचे रवा

1/4 टीस्पून हळद

2 चमचे तेल

1 मोठा बारिक चिरलेला कांदा

1 टीस्पून लसूण पेस्ट

1/2 टीस्पून लाल तिखट

1/2 टीस्पून धने पावडर

मीठ

  • कृती

सर्वात पहिले कांदा, लसूण पेस्ट घालून कांदा तपकिरी होईपर्यंत परतून घ्यावे.

नंतर पॅनमध्ये मॅश केलेले कॉर्न घालावे. त्यात लाल तिखट, हळद, धणेपुड आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.

नंतर उरलेला भात एका भांड्यात काढून मॅश करावे. नंतर भाजलेला रवा टाकावा. कणिकेसारखे मळून घ्यावे.

नंतर छोटे छोटे गोळे करून टिक्की बनवावे. नंतर मधोमध चीजचा तुकडा ठेवावा.नंतर नीट बंद करावे.

नंतर तव्यावर १ चमचा तेल टाकून दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत तळावे. तयार आहे तुमची चीज राईस टिक्की

टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT