Watermelon Juice Benefits: उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. बहुतेक लोक या रसाळ फळाचा खूप आनंद घेतात. काहींना कलिंगड कापून खायला आवडते तर अनेकांना ज्यूस बनवून प्यायला आवडते.
कलिंगड हे पोषक तत्वांनी समृद्ध फळ आहे, जे शरीराला पुरेसे पाणी देखील देते. हे हायड्रेशनसाठी खूप चांगले मानले जाते. कलिंगड निरोगी लोकांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन काळजीपूर्वक करावे.
जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहचू शकते. कलिंगड खाल्ल्याने साखरेच्या रुग्णांना काय त्रास होऊ शकतो याचा विचार तुम्ही करत असाल तर जाणून घ्या यातील आश्चर्यकारक गोष्टी.
अन्नपदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम करतो. जर अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तर साखर रक्तप्रवाहात वेगाने जाईल आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढेल, तर कमी निर्देशांक असलेल्या पदार्थांचा साखरेच्या पातळीवर फारसा परिणाम होत नाही.
ग्लायसेमिक इंडेक्स 1 ते 100 च्या प्रमाणात मोजला जातो. मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, कलिंगडचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 च्या आसपास आहे.
तज्ज्ञांच्या मते, 70 किंवा त्याहून अधिक ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ उच्च जीआय श्रेणीमध्ये गणले जातात. कलिंगडमध्येही भरपूर साखर असते. 286 ग्रॅम कलिंगडमध्ये सुमारे 17.7 ग्रॅम साखर असते. जर तुम्ही एक कप कलिंगड खाल्ले तर त्यात 10 ग्रॅम साखर असते.
मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड कमी खावे
मधुमेही रुग्ण कलिंगडचे सेवन माफक प्रमाणात करू शकतात, कारण त्यामध्ये भरपूर पाणी असते आणि त्यामुळे ग्लायसेमिक भार कमी होतो.
कलिंगड हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे आणि त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. अशावेळी ते कमीत कमी प्रमाणातच खावे.
ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे आणि साखरेची पातळी झपाट्याने बदलते त्यांनी कलिंगड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल, तर तुम्ही याचे भरपूर सेवन करून आरोग्यास लाभ मिळवू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.