Water Apple Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Water Apple: वेट लॉस ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत 'या' 6 कारणांसाठी वॉटर अ‍ॅपल लाभदायी

वॉटर अ‍ॅपल हे फळ केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये आढळते.

Puja Bonkile

Water Apple Health Benefits: निरोगी आरोग्यासाठी फळ आणि भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर असते. अनेक लोक सफरचंद, केळी, पेरू,डाळिंब खातांना दिसतात. तुम्हाला या फळांचे फायदे माहिती असेलच. पण तुम्ही कधी वॉटर अ‍ॅपल चे नाव ऐकले आहे का? जर नसेल आज आम्ही तुम्हाला या फळांचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.

वॉटर अ‍ॅपल हे फळ उष्णकटिबंधीय फळ आहे.या फळाचे मुळ दक्षिण-पूर्व आशिया आहे. पण हे फळ केरळ आणि आंध्र प्रदेश सारख्या भारतातील काही राज्यांमध्ये देखील आढळते. 

  • वजन नियंत्रणात राहते

वॉटर अ‍ॅपलचे सेवन केल्याने तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता. या फळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर या फळाचे सेवन करू शकता.

  • हायड्रेट ठेवते

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि डिहायड्रेशन होते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही वॉटर अ‍ॅपलचे सेवन करू शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

  • अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध फळ

वॉटर अ‍ॅप्पलमध्ये गॅलिक अ‍ॅसिड, टॅनिन आणि क्वेर्सेटिन यांसारख्या मजबूत अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करते. तसेच तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. .

  • डायबिटीज नियंत्रणात राहते

डायबिटीजच्या रुग्णांसाठी वॉटर अ‍ॅपल या फळाचे सेवन खूप फायदेशीर आहे. कारण त्यात शक्तिशाली अँटीहाइपरग्लाइसेमिक गुणधर्म आहेत. या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.  यामुळेच हे फळ खाल्यास डायबिटीज नियंत्रणात राहते.

  • हृदयाचे आरोग्य निरोगी

वॉटर अ‍ॅपलमध्ये पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. यामुळेच हे फळ खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाबाच्या नियंत्रणात राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT