Washing Machine Tips: अनेक लोकांकडे वॉशिंग मशीन आहे. यामुळे कपडे धुणे सोपे झाले आहे. तसेच वॉशिंग मशीनमुळे महिलांच्या वेळीची बचत देखील होते. पण या वॉशिंग मशीनमध्ये लिक्विड की पावडर डिटर्जेंट वापरणे योग्य आहे हे जाणून घेऊया.
लिक्विड डिटर्जेंट कि पावडर डिटर्जेंट
लिक्विड आणि पावडर हे दोन्ही डिटर्जेंट कपडे स्वच्छ करण्यास मदत करतात. हे दोन्ही डिटर्जेंट वॉशिंग मशिनमध्ये वापरले जातात. पण वॉशिंग मशिन कपडे धुण्यासाठी लिक्विड डिटर्जेंट वापरणे उत्तम मानले जाते.
लिक्विड डिटर्जेंट का उत्तम मानले जाते?
पावडर डिटर्जंटपेक्षा लिक्विड डिटर्जेंट चांगले मानले जाते. कारण ते वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यावर अगदी सहजपणे विरघळते तर पावडर डिटर्जंटचे कण लवकर विरघळत नाहीत. पावडर डिटर्जंट कपड्यांवर तसेच राहू शकते. यामुळे कपडे स्वच्छ निघत नाही.
लिक्विड डिटर्जेंट वापरण्याचे फायदे
वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुण्यासाठी लिक्विड डिटर्जंट वापरणे उत्तम मानले जाते. कारण लिक्विड डिटर्जंट वॉशिंग मशिनमध्ये टाकल्यावर लगेच मिक्स होते. यामुळे मशीनवर जास्त लोड येत नाही आणि विज बीलाची बचत होते. कारण कपड्यांमधून डिटर्जंटचे ग्रीस काढण्यासाठी अतिरिक्त स्पिनची गरज पडत नाही. तसेच लिक्विड डिटर्जंट पावडरप्रमाणे मशीनचा ड्रेनेज देखील ब्लॉक करत नाही. यामुळे मशीन दीर्घकाळ चांगली काम करते.
टिप: जर तुम्हाला पावडर डिटर्जंटच वापरायचे असेल तर सर्वात पहिले कपडे पावडर डिटर्जंटच्या पाण्यात भिजत ठेवावे आणि नंतरच वॉशिंग मशीनमध्ये टाकावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.