वेरोडीना  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

भारलेल्या क्षणांमधील जादू

वेरोडीनाच्या चित्रकार बनण्याला, तिच्या त्या वेळच्या, घराच्या फरश्यावर तिने रेखाटलेल्या रेघोट्यांची पार्श्वभूमी आहे.

दैनिक गोमन्तक

वेरोडीना लहान होती तेव्हा आपल्या भावंडांबरोबर, आपल्या भल्या मोठ्या घराच्या लाकडी फरश्यांवर चित्रे रंगवायची. या चित्रांच्या रेघोट्या कधीकधी भिंतीवरदेखील चढायच्या. तिच्या आई-वडिलांचे अर्थात त्यांच्या त्या चित्रकारितेला उत्तेजन होतेच. वेरोडीनाच्या चित्रकार बनण्याला, तिच्या त्या वेळच्या, घराच्या फरश्यावर तिने रेखाटलेल्या रेघोट्यांची पार्श्वभूमी आहे. (Verodina's journey with art in goa)

फाईन आर्टमध्ये पदवी मिळवल्यानंतर वेरोडीना डी’सौसाने ‘सिरॅमिक’ हे आपले माध्यम बनवले. त्यातल्या तांत्रिक खूबी तिने मुंबईला (Mumbai) जाऊन शिकून घेतल्या आणि या माध्यमातला तिचा दीर्घ ‘क्रिएटिव्ह’ प्रवास सुरू झाला. मुंबईहून परतल्यानंतर आपल्या मित्राबरोबर तिने स्टुडिओ उघडून मातीकामाला सुरुवात केली. सुरुवातीला तिने वेगळ्या रचनेच्या, मातीच्या उपयुक्त कलाकृती करायला सुरुवात केल्या पण जेव्हा वेंडल रॉड्रिक्स यांनी तिच्या एका मातीच्या शिल्पकृतीला पणजी (Panjim) शहराच्या एका चौकात स्थानापन्न केले तेव्हा वेरोडीनाचे काम लोकांच्या नजरेत ठळकपणे भरले. तिच्या त्या शिल्पाला मिळालेला प्रतिसाद अद्भूत होता.

झाडाची एखादी फांदी, एखादा ढग किंवा वैशिष्टपूर्ण आकाराचा तुकडा- अशी डोळ्यात भरणारी कुठलीही गोष्ट तिला स्फूर्ती देते. तिच्या डोळ्यांना आकर्षून घेणारी कुठलीही गोष्ट तिच्या कलाकृतीचा विषय बनते. एखादा साबणाचा ट्रे, वाडगे, बागेमधली एखादी मानवाकृती किंवा चर्च (जी सुमारे दहा फूट उंचीची असतात). ती म्हणते, ‘मी साधन मात्र असते. एका भारलेल्या मनाने मी माझ्या हातातल्या मातीला आपला आकार धारण करायची मोकळीक देते.’

वेरोडीनाच्या कामात सहजता असते. उत्स्फूर्तता, मातीचा रंग आणि फार सुबक नसलेली शिल्पे यांचा तिथे निःशब्द संवाद असतो.... पण ती शिल्पे बोलतात, ती संवाद साधतात.

गोव्यातून नामशेष होत जाणार्‍या अनेक गोष्टींना वेरोडीना आपल्या कलाकृतीद्वारे (Art) पकडून ठेवू पाहते. बाल्कनीतल्या गुजगोष्टी, पत्त्यांचा मांडलेला डाव, मासे विक्रेत्या बायांचा घोळका, चर्चला पायी निघालेले स्त्री-पुरुष.... वगैरे हळूहळू नाहीशा होत भूतकालीन बनणाऱ्या प्रतिमा! वेरोडीना म्हणते, ‘मातीच्या गोळ्यातून असे प्रतिमांचे निर्माण होणे ही फार सुखदायक आणि पूर्णत्वाची अनुभूती असते. तो एक ‘कॅथार्टिक’ आणि उपचारात्मक असा श्रांत करणारा अनुभव असतो.

अर्थात, अवघड वाटावे असा काळही दरम्यान तिच्या वाट्याला आला, ज्याने वेरोडीनाला अधिक कणखर बनवले. हे सारं सोडून द्यावं असं देखील तिला या काळात वाटून गेलं. पण कष्ट, सातत्य आणि कायम पाठीशी राहून तिला पाठबळ देणाऱ्या तिच्या कुटुंबामुळे ती इथवर मजल गाठू शकली.

साळगावमध्य्रे राहणाऱ्या वेरोडीनाचा स्टुडिओ म्हापसा-पेडे येथील आकय इथे आहे. वेरोडीना नित्यनियमाने आपल्या स्टुडिओत कामाला जाते. ती म्हणते, ‘माझं माझ्या कामावर नितांत प्रेम आहे. कामात रमून असणं मला आवडतं.’ वेरोडिनच्या शिल्पाकृती पाहिल्या तर त्यात तिचं सफल झालेला प्रेमच दिसतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT