Vehicle Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vehicle Tips: कोणत्याही वाहनाचा विमा काढताना करू नका 'या' चुका, अन्यथा उद्भवतील समस्या

कार, ​​बाईक किंवा इतर कोणतेही वाहन असो, विमा काढणे खूप महत्त्वाचे असते. पण अनेक लोका विमा काढताना सर्वात सामान्य चुका करतात. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vehicle Tips: कोणत्याही वाहनाच्या सुरक्षिततेसाठी विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु अनेक लोक विमा काढताना काही सामान्य चुका करतात. त्यामुळे त्यांना नंतर अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

योग्य कंपनी निवडावी

जेव्हा तुम्हाला विमा घ्यावा लागतो तेव्हा योग्य कंपनी निवड करणे देखील गरजेचे आहे. वाहनांचा विमा बाजारात अनेक कंपन्यांकडून दिला जातो. ज्यामध्ये अनेक प्रकारचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. पण गरजेच्या वेळी अनेक कंपन्या क्लेम देण्यास विलंब करतात. त्यामुळे ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

योग्य विमा खरेदी करा

तुमचे वाहन नेहमी सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य विमा खरेदी करणे फार महत्वाचे आहे. काही लोक फक्त पैसे वाचवण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतात. त्यामुळे गरजेच्या वेळी वाहन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला स्वत: पैसे खर्च करावे लागतात. असे करणे कधीकधी खूप महागात पडू शकते.

संपूर्ण पॉलिसी नीट वाचावी

जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनासाठी कोणत्याही कंपनीची पॉलिसी निवडाल तेव्हा तुम्ही पॉलिसीसोबत आलेल्या सर्व अटी व नियम वाचल्या पाहिजेत. अनेक वेळा कंपन्या अशा अटी आणि नियम लादतात ज्या गरजेच्या वेळी पूर्ण करणे कठीण असते आणि नंतर क्लेम प्राप्त करण्यास वेळ लागतो.

अ‍ॅड ऑन पर्याय घेताना घ्या काळजी

पॉलिसी देताना कंपन्यांकडून अनेक प्रकारचे अॅड ऑन पर्याय दिले जातात . परंतु त्यापैकी तुमच्यासाठी फक्त योग्य अॅड ऑन निवडणे समजुतदारीचे असते. विनाकारण अनेक अॅड ऑन घेतल्याने पॉलिसीचा प्रीमियमही वाढतो. यामुळे फक्त योग्य अॅड ऑन निवडले पाहिजे आणि पॉलिसीमध्ये समाविष्ट केले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT