Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: जर जोडीदाराशी वाद होत असेल तर 'या' वनस्पतीची पाने ठेवा जवळ

घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे शुभ मानले जाते.

Puja Bonkile

vastu tips tulsi leaves keep under pillow get rid marriage life and money problem read full story

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती भगवान विष्णूचीही प्रिय आहे. यामुळेच भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला तुळशीशिवाय प्रसाद अर्पण केले जात नाही.

रोज सकाळी दिवा लावण्याबरोबरच औषधातही त्याचा उपयोग होतो. बहुतेक घरांमध्ये तुळशीची पाने असतात. याशिवाय तुळशीच्या रोपासाठी अनेक उपाय आणि नियमांचा अवलंब केला जातो. त्यांचा अवलंब केल्याने माणसाचे मन शांत होते आणि नातेसंबंध सुधारतात.  तुळशीची पानं औषध म्हणून कशी फायदेशीर आहेत हे जाणून घेऊया.

तुळशीच्या पानांचा असा करा वापर

वैवाहिक जीवनात तणाव,चिंता आणि घरात आशीर्वाद नसेल तर तुळशीची पाच पाने उशीखाली दाबून ठेवावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जी आपोआप निघून जाईल. घरात सुख-शांती नांदेल. नात्यात गोडवा देखील वाढेल. 

तुळशीची पाने उशीखाली ठेवण्याचे फायदे

पती-पत्नीमध्ये तणाव असल्यास नात्यांमध्ये कटूता निर्माण होते. त्यामुळे पती-पत्नी दोघेही 5 तुळशीची पाने उशीखाली ठेवून झोपले पाहिजे. असे केल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते. नकारात्मकता निघून जाते आणि भांडणे होत नाहीत. 

रात्री झोपण्यापूर्वी तुळशीची पाच पाने उशीखाली ठेवावी. यामुळे नकारात्मकता दूर होईल. मन सकारात्मक राहील. याने शांती आणि सुख-समृद्धी नांदेल. मन सदैव प्रसन्न राहील. 

दिवसभराच्या तणावामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही तुळशीच्या पानांचा हा उपाय वापरू शकता. तुळशीची पाच पाने उशीखाली ठेवून झोपल्यास शांत झोप येते. तणावही दूर होईल. 

तुळशीच्या पानांचा हा उपाय बिझनेस आणि नोकरीतील समस्यांपासून देखील आराम मिळवू शकतो. यामुळे घरामध्ये समृद्धी येते तसेच बिझनेसमध्ये वाढ होते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

SCROLL FOR NEXT