Vastu Tips: तुमच्या या सवयीमुळे तुम्ही होऊ शकता कर्जबाजारी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुमच्या या सवयीमुळे तुम्ही होऊ शकता कर्जबाजारी

तुमच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्राबद्दल अनेक लोकांना माहिती नसते. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की घरातील सुईपासून ते भिंतीवरील पेंटिंग कुठे लावायची यात सुद्धा वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्राचे आपल्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.

आपल्या रोजच्या जिवनमानात आपण अनेक लहान लहान चुका करतो, ज्यामुळे वास्तु दोष निर्माण होतात. वास्तु दोषामुळे यश, आनंद आणि समृद्धीच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकते. तुमच्या कोणत्या सवयीमुळे वास्तु दोष निर्माण होतात हे जाणून घवूया.

* अनेक लोकांना अंथरुणावर जेवण करण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार असे चुकीचे मानले जाते. कारण अशा लोकांच्या घरात समृद्धी टिकून राहत नाही. अंथरुणावर जेवण करण्याच्या सवयीमुळे त्या लोकांना यश मिळत नाही. तसेच अशा लोकांवर कर्ज लवकर होते.

* रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवणे योग्य नाही. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की खरकटी भांडी ठेवल्याने घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. रात्री स्वयंपाकघराची स्वच्छता करूनच झोपावे. कारण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन अनेक समस्या कमी होतात.

* स्वयंपाक घरात नेहमी पाणी भरून ठेवलल्याने घरात आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि घरातील आर्थिक समस्या कमी होतात.

* वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला दान देवू नये. तसेच दूध, दही आणि मीठ यासारखे पदार्थ सुद्धा संध्याकाळच्या वेळी देवू नये. कारण असे केल्यास आपली आर्थिक स्थिति खराब होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT