Vastu Tips For Child Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: मुलांसाठी गिफ्ट खरेदी करताय? मग 'या' वास्तु टिप्स नक्की फॉलो करा

Vastu Tips: अनेकदा आपण आपल्या मुलांसाठी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गिफ्ट घेतो. पण तुम्ही वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Puja Bonkile

vastu tips related buying gift for child read full story

अनेक पालक जेव्हा त्यांचे मुलं चांगले काम करतात किंवा परिक्षेत यश मिळवतात तेव्हात्यांना प्रेरणा देण्यासाठी काही गिफ्ट देतात. त्यामुळे त्यांच्या मनात एक नवी ऊर्जा येते. इतकंच नाही तर काही वेळा वाढदिवसासारख्या खास प्रसंगी मुलांना गिफ्ट देतात.

जेव्हा मुलांसाठी गिफ्टचा विचार केला जातो तेव्हा आपल्याकडे बाजारात पर्यायांची कमतरता नसते. तुम्ही मुलाला कपड्यांपासून ते खेळणी, स्टेशनरी वस्तू खूप काही देऊ शकता.

साधारणपणे, जेव्हा मुलासाठी गिफ्ट खरेदी करतो तेव्हा आपण त्याचे वय लक्षात ठेवतो. मुलाच्या वयानुसार गिफ्ट खरेदी करतो. मात्र, केवळ वयाची काळजी घेणे पुरेसे नाही. मुलासाठी असे गिफ्ट खरेदी केले पाहिजे, ज्यामुळे त्याच्यासाठी सकारात्मकता येईल.

कामाची वस्तु द्यावी

जेव्हा तुम्ही एखाद्या मुलासाठी गिफ्ट खरेदी करता तेव्हा त्याच्या कामात पडेल अशा वस्तु खरेदी कराव्या. जसे की मुल चार वर्षांचे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी असे गिफ्ट खरेदी करू नका जे सहा ते सात वर्षाच्या मुलांशी उपयुक्त असेल.

जर एखादे गिफ्ट जास्त दिवस असेच ठेवले तर त्यातून नकारात्मकता वाढते. यामुळे मुलाचे मनही अस्वस्थ होऊ शकते.

सॉफ्ट टॉइज

सॉफ्ट टॉइज गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे खूप आरामदायक आहेत आणि मुले देखील त्यांच्याबरोबर खेळण्याचा आनंद घेतात. पण जेव्हा तुम्ही मुलासाठी सॉफ्ट टॉइज विकत घेता तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये सिंह, बिबट्या, साप इत्यादी कोणत्याही हिंसक प्राण्याची सॉफ्ट टॉइज घेऊ नका.

आजकाल सर्व प्रकारची सॉफ्ट टॉइज बाजारात मिळतात. शिकारी प्राण्यांची सॉफ्ट टॉइज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे मुलांच्या खोलीत गुदमरल्यासारखे होते आणि त्यांच्या विकासात अडथळा निर्माण होतो.

धातूचे खेळणे टाळावे

आपल्या मुलासाठी गिफ्ट खरेदी करताना त्याच्यासाठी कोणतीही धातूचे खेळणी घेऊ नका. यामुळे मुलाला दुकापत होऊ शकते. त्याच वेळी जर आपण आपल्या मुलासाठी खेळणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याच्यासाठी जास्त प्लास्टिकची खेळणी खरेदी करू नका. त्याऐवजी लाकडापासून बनवलेली खेळणी खरेदी करू शकता.

माइंड बेस गिफ्ट

वास्तूनुसार मुलांना अशा भेटवस्तू देणे चांगले मानले जाते, जे वापरताना त्यांचे मन गुंतेल पाहिजे. जसे की पजल्स, रंग, चित्रकला इत्यादी गोष्टी तुमच्या मुलांना भेट म्हणून दिल्या जाऊ शकतात. यामुळे मुलाचे माइंड शार्प होते आणि त्याची क्रिएटिव्हिटी वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT