Vastu Tips For Wallet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Wallet: तुम्हीही वॉलेट पँटच्या मागील खिशात ठेवताय, होऊ शकते आर्थिक नुकसान

Wallet in back Pocket: अनेक मुलं त्यांचे वॉलेट पँटच्या मागील खिशात ठेवतात. पण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Puja Bonkile

vastu tips never keep wallet on back pocket read reason

अनेक मुलं त्यांचे वॉलेट पँटच्या मागील खिशात ठेवतात. त्यात पैशांपासून ते कार्ड्स, देवाच्या फोटोपासून ते आपल्या स्वत:च्या फोटोंपर्यंत सर्व काही आहे, पण असे करणे योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार पँटच्या मागील खिशात वॉलेट ठेवणे अशुभ मानले जाते. हे अत्यंत गंभीर आणि चुकीचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मीचा नाराज होतात. यामुळे जीवनात संकटांना सामोरे जावे लागते.

वॉलेट ठेवण्याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आसले आहेत. यामध्ये वॉलेट कुठे ठेवावे आणि त्यात काय ठेवावे हे जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष प्रकट होतो. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. माणसाच्या यशात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे वॉलेट समोरच्या खिशात ठेवणे शुभ मानले जाते.

  • पर्स ठेवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रात वॉलेटशी संबंधित काही नियम सांगितले आहेत. वॉलेट ठेवताना त्यात ठेवलेल्या वस्तूंचाही विचार करायला हवा. पर्समध्ये काहीही भरल्याने पैशांचा ओघ थांबतो. माणसाचे नशीबही खराब होऊ शकते.

  • चाव्यांचा गुच्छ

वास्तूनुसार वॉलेटमध्ये चावीचा गुच्छ कधीही ठेऊ नका. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागू शकते.

  • औषधे

वॉलेटमध्ये चुकूनही औषधे ठेऊ नका. त्याचा व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. तसेच याचा थेट परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर देखील होतो. यामुळे व्यक्ती आजारी पडू शकतो.

  • फाटलेल्या जुन्या नोटा

वॉलेटमध्ये जुन्या फाटलेल्या नोटा चुकूनही ठेवू नका. त्याचा नशिबावर परिणाम होतो. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा तुमच्या उत्पन्नावर वाईट परिणाम होतो. माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. पैसा असाल तरी खर्च जास्त होतो.

  • देवी-देवतांचे फोटो

वॉलेटमध्ये देव, देवतांचे किंवा पूर्वजांचा फोटो कधीही ठेवू नका. यातून वास्तुदोष प्रकट होतात. त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. व्यक्तीच्या जीवनातील समस्या वाढतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT