Vastu Tips For Swing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: बाल्कनीमध्ये झुला लावताना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Vastu Tips For Swing: तुम्ही घरी झुला लावत असाल तर वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम फॉलो केले पाहिजे.

Puja Bonkile

vastu tips keeping swing in home balcony read vastushtra tips

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींसाठी उपाय सांगितलेले आहेत. वास्तुत सांगितलेले नियम आणि टिप्स फॉलो केल्यास घरातील अनेक समस्या दूर होतात. अनेक लोकांना घरात झुला लावायला आवडते. काहीजण बाल्कनीच ठेवतात तर काही घराच्या हॉलमध्ये ठेवतात.

पण घराच्या बाल्कनीमध्ये झुला ठेवतांना वास्तुचे काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे बाल्कनीतील त्या झुल्यावर बसून तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. वास्तुशास्त्रात बाल्कनित झुला ठेवण्याची योग्य दिशा आणि रंग याबात सविस्तर माहिती दिली आहे.

झुल्याचा रंग

जेव्हा तुम्ही बाल्कनीमध्ये झुला लावता तेव्हा त्याचा योग्य रंग निवडावा. झुल्यावर खूप डार्क लाल रंग लावू नका. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना झुला झुलायला आवडते. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही हालणाऱ्या वस्तुवर डार्क लाल रंग वापरल्याने नकारात्मकता निर्माण होते. झुल्यावर पांढरा किंवा क्रीम रंग सर्वोत्तम मानला जातो. जर तुमचा झुला लोखंडाचा असेल तर त्याला काळा रंग द्यावा.

कोणतेहा अडथळा नसावा

बाल्कनीत झुला ठेवताना त्याच्या आजूबाजूला कोणताही अडथळा नसावा. दगड, विटा किंवा तुटलेली वस्तू अशा प्रकारचा कोणताही अडथळा नसावा. यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. तसेच वास्तुशास्त्रात असे करणे अशुभ नाले जाते. याशिवाय बाल्कनीत ठेवलेल्या झुल्याची स्वच्छता ठेवावी.

आवाज येत नसावा

अनेक वेळा बाल्कनीत ठेवलेला झुला वापरताना त्यातून विचित्र आवाज येतो. अशा झुल्यातून आवाज येणे चांगले मानले जात नाही. जर असे झाले तर तुम्ही झुल्यामध्ये तेल टाकू शकता किंवा दुरुस्त करू शकता. अनेक लोक झुल्यावर कपडे वाळवतात असे करणे देखील अशुभ मानले जाते.

योग्य दिशा

जेव्हाही बाल्कनीत झुला ठेवता तेव्हा योग्य दिशेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. बाल्कनीच्या पश्चिम दिशेला झुला ठेवता येतो. याशिवाय वायव्य-पश्चिम दिशेलाही झुला ठेवू शकता. वास्तुनुसार उत्तर-दक्षिण दिशे अशुभ मानली जाते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT