Vastu Tips: आपल्या प्रत्येकाला आपल्या कामात आणि जीवनात यश हवे असते. अनेक वेळा लोक स्वतःचे काही नवीन काम सुरू करतात किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. एखादे नवीन काम सुरू करताना त्या कामात भरभरून प्रगती व्हावी आणि यश मिळावे हिच इच्छा असते. पण प्रत्येक वेळी असेच होईल, असे नाही. साधारणपणे, जेव्हा लोक कामाला सुरुवात करतात आणि खुप मेहनत करतात, तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाहीत. अशावेळी ते लोक खूप निराशा होतात. तुमच्या बाबतीत असे होऊ नये म्हणून तुम्ही वास्तूचे काही नियम फॉलो केले पाहिजे.
तुम्ही बॉस असाल तर...
जर तुम्ही स्वतःचे कोणतेही नवीन काम सुरू केले असेल आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बॉस असाल तर तुम्ही नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला बसावे. या दिशेला बसल्याने तुम्हाला स्थिरता मिळेल आणि त्यामुळे तुमच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही.
चेहऱ्याची दिशा
जेव्हा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करता तेव्हा तुम्ही दिशेला महत्व द्यावे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचा विचार कराल किंवा करारावर स्वाक्षरी कराल किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक कराल तेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. यामुळे तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या कामात सतत प्रगती होईल. तुमच्या पैशासंबंदित व्यवहार करताना तोंड नेहमी उत्तर दिशेला असावे.
ही चूक करू नका
ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा लोक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी स्टिकी नोट्सची मदत घेतात. ते त्यांच्या संगणकाच्या फ्रेमवर चिकटवतात. पण वास्तूनुसार यामुळे खूप नकारात्मकता पसरते. ही चूक करणे टाळावे.
टेबल असे असावे
तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचे अशुभ किंवा नकारात्मकता येऊ नये म्हणून ऑफिसमध्ये प्रत्येकाची खुर्ची आणि टेबल पूर्णपणे स्वच्छ असावी. अनेकवेळा असे घडते की आपण चहा किंवा कॉफी टेबलावर ठेवून पितो. त्यामुळे त्याचे डाग तिथेच राहतात. तुम्ही अशी चूक करू नये. तुमचा टेबल नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यामुळे कामातही नकारात्मकता येते. तसेच, प्रलंबित काम तुमच्या टेबलावर ठेवू नका. हे देखील वास्तुनुसार चांगले मानले जात नाही. ऑफिसचे काम त्याच दिवशा पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.