Turtle Ring Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Turtle Ring Benefits: कासवाची अंगठी घातल्याने काय फायदे होतात? इथे वाचा

आयुष्यात यश प्राप्ती करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

Kavya Powar

Turtle Ring Benefits: आयुष्यात यश प्राप्ती करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी एक म्हणजे कासवाची अंगठी. अनेकजण कासवाची अंगठी वापरतात. याचे कारण असे की कासवाची अंगठी केवळ आकर्षक दिसत नाही तर ती संपत्ती आणि समृद्धी देखील आकर्षित करते.

असे म्हटले जाते की कासवाच्या आकाराची अंगठी घातल्याने दुर्दैव दूर होते. जो कोणी कासवाची अंगठी धारण करतो त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते.

कासवाची अंगठी घालण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी धारण केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सभोवताली सकारात्मक ऊर्जा येते. ज्योतिषशास्त्रात कासवाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते धारण केल्याने घरामध्ये ऐश्वर्य आणि सुख-समृद्धी येते.

असे मानले जाते की जो कासवाची अंगठी घालतो त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा आणि संपत्ती प्राप्त होते. यासोबतच आर्थिक संकटही दूर होते. कासवाला शांती आणि संयमाचे प्रतीक मानले जाते.

कासवाची अंगठी घालताना पाळा 'हे' नियम

असे मानले जाते की कासवाची अंगठी फक्त चांदीच्या धातूपासून बनवावी तरच त्याचे शुभ परिणाम दिसून येतात. ही अंगठी फक्त उजव्या हातात घातली पाहिजे. डाव्या हातावर धारण केल्याने कोणताही फायदा होत नाही.

कासवाची अंगठी फक्त उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटात घातली पाहिजे. ते परिधान करताना, कासवाचे डोके तुमच्या दिशेने असावे. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT