Pen Holder Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pen Holder: पेन होल्डर कोणत्या दिशेला ठेवणे मानले जाते शुभ, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

चला तर मग जाणून घेऊया पेन होल्डर ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे.

Puja Bonkile

Pen Holder: कोणतीही वस्तू घरात ठेवण्यासाठी योग्य दिशा जाणून घेणे फार महत्वाचे मानले जाते. अन्यथा आपल्या आयुष्यावर त्याचा विपरित परिणाम पडू शकतो. तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी बरेच लोक लिहिल्यानंतर पेन कुठेही ठेवतात आणि भारतीय घरांमध्ये पेन होल्डर असूनही ते योग्य दिशेने ठेवले जात नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया पेन होल्डर ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे.

  • उत्तर-पुर्व दिशा

वास्तुनुसार पेन होल्डर घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळते आणि त्याला कधीही कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. 

  • सकारात्मक ऊर्जेचे केंद्र

पेन होल्डर हे सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरात पेन होल्डरमध्ये पेन न ठेवता आणि इतर कोणत्याही दिशेला ठेवत असाल तर लगेच काढून टाका. पेन नेहमी होल्डरमध्येच ठेवावे. यामुळे तुम्हालाही पेन शोधावा लागणार नाही.

  • टोपनशिवाय पेन ठेवू नका

पेन होल्डरमध्ये टोपनशिवाय पेन चुकूनही ठेऊ नका. यामुळे घरात कलहाची परिस्थिती निर्माण होते. तसेच कोणत्याही कामात कधीच यश मिळत नाही. त्यामुळे चुकूनही पेन होल्डरमध्ये टोपनशिवाय पेन ठेवू नका. 

  • या रंगाचे पेन होल्डर ठेवावे

जर तुम्ही घरी पेन होल्डर ठेवत असाल तर निळ्या रंगाचा पेन होल्डर ठेवावा. वास्तुनुसार हे शुभ मानले जाते. तसेच शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पेन ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या. 

  • ऑफिसमध्ये कुठे ठेवावे

ऑफिसमध्ये पेन होल्डर पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि शुभ परिणाम देखील मिळू शकतात. वास्तूनुसार ऑफिसमध्ये बसल्यास व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी प्रगती होते. त्यामुळे ऑफिसमध्ये योग्य दिशेला बसण्यासोबतच पेन होल्डरही त्याच दिशेने ठेवावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT