Relationship Tips: कोणतंही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून राहते. तसेच नात्यात संबाद असणे देखील गरजेचे आहे. जोपर्यंत पती-पत्नी एकमेकांसमोर मनमोकळेपणाने बोलत नाही तोपर्यंत नात्यात गोडवा वाढत नाही. बिनधास्त संवाद हा कोणत्याही नात्याचा अत्यावश्यक पैलू आहे. जेव्हा तुमचा पती तुमचे ऐकत नाही, तुमच्या हृदयात आणि मनातल्या गोंधळाची पर्वा करत नाही तेव्हा खूप वाईट वाटते. यामुळे तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.
बोलण्यासाठी वातावरण तयार करा
जर तुमचा जोडीदार तुमचे अजिबात ऐकत नसेल तर बोलण्यासाठी योग्य वातावरण तयार करावे. जोडीदाराला आपले म्हणणे शांतपणे समजुन सांगावे. जाडीदार कामात असेल तर महत्वाच्या गोष्टी बालणे टाळावे.
काळजीपूर्वक ऐका
तुमचा जोडीदार तुमचे ऐकत नसेल कारण तुम्ही देखील त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नसाल. यामुळे एकमेकांचे बोलणे काळजीपुर्वक ऐकावे.
स्पष्ट बोलावे
जोडीदाराल आपले विचार स्पष्टपणे सांगावे. तुमच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी शांतपणे बोलावे.
पतीला समजुन घ्यावे
समजूतदारपणा आणि सहानुभूतीला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार करणे आवश्यक आहे. तुम्हाला त्यांचा दृष्टीकोन समजला आहे असे त्यांना वाटू द्या. प्रत्येक वेळी जेव्हा तो तुम्हाला त्याच्या गोष्टींबद्दल काळजी घेताना पाहतो तेव्हा तो तुमचे म्हणणे ऐकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.