lord shiva Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Lord Shiva: महादेवाची मूर्ती या दिशेला ठेवल्यास मिळतील पूजेचे पूर्ण फळ

जर तुमच्या घरात भगवान शंकराची मुर्ती असेल तर तुम्हाला काही खास वास्तू नियमांचे पालन करावे लागेल.

Puja Bonkile

Vastu Tips For Lord Shiva: वास्तुशास्त्र तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी अनेक प्रकारे मदत करू शकते. असे मानले जाते की घरामध्ये ठेवलेल्या कोणत्याही वास्तूची दिशा आणि स्थान वास्तुनुसार निश्चित केले तर घरात नेहमी समृद्धी राहते.

तसेच वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरामध्ये शंकराची मूर्ती ठेवली तर त्याचेही अनेक सकारात्मक फायदे होतात. तुम्ही जरी परदेशात राहत असाल तरी शिवमूर्तीसाठी वास्तूशी संबंधित काही खास नियमांचे पालन करावे.

जर शिवमूर्तीची स्थापना वास्तूनुसार असेल तर घरामध्ये समृद्धी येते. या मूर्तीची चुकीची दिशा देखील तुमच्या जीवनात समस्या निर्माण करू शकते. 

  • योग्य दिशा कोणती?

घरामध्ये शंकराची मूर्ती बसवण्याची योग्य दिशा म्हणजे घराचा ईशान्य कोपरा आहे. याला इशान कोन असेही म्हटले जाते आणि ही घराची सर्वात शुभ दिशा मानली जाते. ज्योतिष शास्त्रातही या ठिकाणी घराचे मंदिर स्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास ती उंच ठिकाणी व वेदीवर ठेवावी व तिचे तोंड उत्तरेकडे असावे.

  • घरामध्ये शिवमूर्ती ठेवण्याचे वास्तू फायदे 

घरामध्ये शिवमूर्तीची स्थापना केल्याने सुख-शांती नांदते. तसेच घरातील नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते. 

महादेवाची मूर्ती घरामध्ये उत्तम आरोग्य आणि समृद्धी वाढवण्यास मदत करते. 

नशीब आणि समृद्धी आकर्षित करण्यास मदत करते.

  • घरात मुर्ती ठेवण्याची योग्य जागा

जर तुम्ही घरी महादेवाची मूर्ती ठेवत असाल तर ती शांत ठिकाणीच स्थापित करावी. जर तुम्ही घरगुती पूजेच्या मंदिरात त्याची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही खूप मोठ्या आकाराच्या मूर्तीची स्थापना करू नये. 

शिवमूर्ती कोणत्याही खिडकी किंवा दरवाज्याजवळ ठेवू नका. कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहत नाही.

बेडरूम किंवा स्नानगृहाजवळ चुकूनही महादेवाची मूर्ती स्थापित करू नका.

शिवमूर्ती नेहमी स्वच्छ आणि चांगली ठेवली पाहिजे. 

घरातील महादेवाची मूर्ती तुटली असेल तर ती लगेच बदलावी आणि तुटलेली मूर्ती घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावी. 

Lord Shiva
  • अशा शिवमूर्ती ठेवू नका 

वास्तुशास्त्रानुसार अशा काही शिव मूर्ती आहेत ज्या घरासाठी शुभ मानल्या जात नाहीत. यामध्ये शिवाचे नटराज रूप प्रमुख मानले जाते. ही शिवाची नाचणारी मूर्ती मानली जाते जी विनाशाशी संबंधित आहे. 

असे मानले जाते की घरात नटराजाची मूर्ती ठेवल्याने अशांतता आणि भांडणे होऊ शकतात. याशिवाय शिवाच्या रुद्र अवताराची मूर्तीही ठेवू नये. घरामध्ये भगवान शंकराच्या रुद्र स्वरूपाची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

  • इतर नियम

महादेवाची मूर्ती दगड किंवा कोणत्याही धातूसारखी नैसर्गिक वस्तुपासून बनवलेली असावी.

मूर्ती चांगल्या स्थितीत असावी आणि कोणत्याही भेगा नसाव्यात.

मूर्तीची प्रतिष्ठापना स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी करून योग्य दिशेची काळजी घेतली पाहिजे.

घरामध्ये महादेवाची मूर्ती ठेवताना वास्तूचे वरिल नियम पाळले तर सदैव घरात सुख- शांती राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT