Vastu Tips For Life Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरातील 'या' गोष्टी रिकाम्या ठेवल्यास जीवनात येईल दारिद्र्य

घरातल्या काही वस्तु रिकाम्या ठेवल्यास तुमच्या घरात गरिबी येऊ शकते.

Puja Bonkile

Vastu Tips For Life: घरात सर्व काही नीट सुरू असतांना जर काही नुकसान होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. घरात काही अशा गोष्टी आहेत ज्या वास्तुशास्त्रानूसार रिकाम्या ठेवल्यास नुकसान होऊ शकते.

वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीच रिकाम्या ठेऊ नये. त्या गोष्टी रिकाम्या ठेवल्यास कोणते नुकसान होतात हे जाणून घेऊया.

  • तिजारी किंवा पाकीट

घरातील तिजोरी किंवा नियमित वापरात असलेले पाकीत कधीच रिकामे ठेऊ नका. त्यात थोडे तरी पैसे ठेवावे. रिकाम्या पर्समुळे गरिबी येते. म्हणून तिजोरी आणि पाकीट कधीच र्कामे ठेऊ नये. तसेच तिजोरीमध्ये गाई, शंख, लक्ष्मीचा फोटो ठेवणे शुभ मानले जाते.

  • रिकामी बादली

वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरातस वास करते. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरलेली ठेवावी. घरात काळी किंवा तुटलेली बादली ठेऊ नये.

  • जीभेवर नियंत्रण ठेवा

आपल्या वाणीवर नेहमी संयम ठेवावा. इतरांचे मन दुखेल किंवा अपमान होइल असे शब्द बोलू नये. ज्या व्यक्तींची वाणी चांगली असेल त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहाते. घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करावा.

  • घरातील डब्बे

घरात माता अन्नपूर्णे देवीची कृपा राहण्यासाठी घरात धान्यांचे डब्बे रिकामे ठेऊ नका. असे केल्याने माता अन्नपुर्णेचा कोप होतो असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

  • देवघरात असलेले पाण्याचे भांडे

वास्तुशास्त्रानुसार देवघरातील पाण्याचे भांडे कधीच रिकामे ठेऊ नका. पूजा झाल्यावर देवघरात एक पात्र पाण्याने भरलेले ठेवावे त्यात काही तुळशीची पाने टाकावी. पाण्याने भरलेले भांडं देवघरात ठेवल्यास देव तहानेने व्याकूळ राहात नाही याउलट तो तृप्त राहतो. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT