Vastu Tips Kitchen
Vastu Tips Kitchen Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Vastu Tips: 'या' वस्तु हातातून खाली पडणं मानलं जातं अशुभ

दैनिक गोमन्तक

Kitchen Vastu Tips: अनेका सकाळी ऑफिसला जाण्याची किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी उशीर झाला तर आपण काम घाईमध्ये करतो. अनेकदा ही कामे पूर्ण होतातही पण अनेकदा याच घाईमुळे आपले काम दुप्पट होते.

वास्तुशास्त्रातही घाई संकटात नेई असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रात काही गोष्टी आपल्या हातून खाली पडणे हे अशुभ मानले जाते. या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून खाली पडल्यास शुभ मानले जात नाही.

  • दूध

दुधाचा रंग पांढरा असल्याने याचा संबंध थेट चंद्राशी दर्शवला जातो. गॅसवर उकणारं दूध उतू गेल्यास किंवा हातातून दुधाचा ग्लास पडल्यास ते शुभ मानले जात नाही. दुधाची खाली पडल्यास आर्थिक संकट येउ शकते असे बोलले जाते.

  • मीठ

मीठ नसेल तर जेवणाला चव येत नाही. पण हेच मीठ तुमच्या नशीबाशीही जोडले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astro Tips) मीठ हे चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे प्रतिनिधी मानले जाते. हातातून मीठ पडल्यास ते अशुभ मानले जाते.

  • तेल

वास्तुशास्त्रात (Vastu Tips) तेल हातातून खाली पडणे हे अशुभ लक्षण आहे. तेल हे शनिदेवाचे प्रतिक आहे असे सांगितले जाते. म्हणूनच हातातून वारंवार तेल पडणे म्हणजे धनाची हानि होणे होय.

  • अन्न

जेवताना किंवा सर्व्ह करताना अन्न सांडणे हे शुभ मानले जात नाही.जेवण वाढताना हातून अन्नपदार्थ खाली पडणे म्हणजे माता अन्नपूर्णेचा अपमान केल्यासारखं आहे. हातून अन्न खाली पडल्यास घरात गरीबी येणार असल्याचं हे लक्षण आहे.

  • काळी मिरी

हातातून काळी मिरी खाली पडणे हे अशुभ लक्षण आहे. काळी मिरी हातातून खाली पडली तर त्याने नात्यात दुरावा येतो, असे सांगितले जाते. हातातून मिरची पडणे नकारात्मकतेला प्रोत्साहन देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

Goa News : कर्नाटकातील खानापूरमधील ऐतिहासिक स्थळांना भेट; ४० जणांचा सहभाग

सेक्स वर्करचे घृणास्पद काम! 200 हून अधिक जणांचा जीव धोक्यात; जाणून घ्या नेमकं प्रकरण?

Vasco Tourist : समुद्रात अडकलेल्या २६ पर्यटकांची तटरक्षक दलाकडून सुखरूप सुटका

Margao News : ‘आपत्कालीन’ व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज; दक्षिण गोवा प्रशासन सतर्क

SCROLL FOR NEXT