Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: तुमच्याही घरात 'या' गोष्टी असतील तर त्वरित काढून टाका; अन्यथा वास्तूदोषाने व्हाल त्रस्त

वास्तुशास्त्र हे उर्जेवर आधारित आहे.

Kavya Powar

वास्तुशास्त्र हे उर्जेवर आधारित आहे. वास्तूनुसार घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तू आणि त्याच्या दिशेमध्ये एक ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते.

घरामध्ये अशी अनेक ठिकाणे आणि गोष्टी आहेत, ज्याचे पालन वास्तुनुसार न केल्यास वास्तु दोष आढळून येतो. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरातून ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

या गोष्टी घरातून काढून टाका

तुमच्या घरात काही तुटलेली काच किंवा आरसा असेल किंवा त्यात तडा गेला असेल तर लगेच बदला. तुमच्या खिडकीची काच तुटलेली असेल तर ती पण काढा.तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा आणते.

तुमच्या घराच्या मंदिरात फाटलेले आणि जुने फोटो किंवा देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या ताबडतोब काढून टाका. यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे मानले जाते.

जर कबुतराने घरात घरटे बनवले असेल तर ते लगेच काढून टाका. त्यामुळे आर्थिक प्रगतीला बाधा येते, असे मानले जाते.

जर घरामध्ये फाटलेले आणि जुने कपडे असतील तर ते काढून टाकावे कारण यामुळे शुक्र ग्रहाचा नाश होतो. त्यामुळे जीवनात आर्थिक समस्या सुरू होतात.

घरातील फाटलेले व जुने शूज आणि चप्पल ताबडतोब काढून टाका कारण त्यांना घरात ठेवल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागते आणि त्याचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

घरामध्ये महाभारत युद्धाचे चित्र, नटराजाची मूर्ती, ताजमहालचे चित्र, बुडणारी बोट, कारंजे, जंगली प्राण्यांचे चित्र, कबरी, काटेरी झाडे असल्यास ती काढून टाकावीत. यामुळे नकारात्मक भावना निर्माण होतात, त्यामुळे आयुष्यात चांगल्या घटना घडणे थांबते.

घराचे घड्याळ बंद किंवा खराब झाले असेल तर ते घरात ठेवू नका. त्यामुळे कामात अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत.

घरात खराब चार्जर, केबल, बल्ब यांसारख्या अनेक विद्युत वस्तू पडल्या असतील तर त्या ताबडतोब काढून टाका.कारण खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

घरामध्ये खराब कुलूप असतील तर हे खराब कुलूप ताबडतोब काढून टाका. कारण खराब कुलुप्याप्रमाणे माणसाची प्रगतीही थांबते.

घरामध्ये कधीही काटेरी झाडे लावू नका किंवा ज्यापासून दूध निघते. या प्रकारच्या वनस्पतींमुळे आर्थिक समस्यांबरोबरच इतर समस्याही उद्भवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT