Vastu Tips For Swastik Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Swastik: घराच्या मुख्य दारावर कोणत्या धातुचे स्वस्तिक लावणे मानले जाते शुभ? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Puja Bonkile

Vastu Tips For copper Swastik main door success luck prosperity

वास्तुशास्त्रात घरात सुख-समृद्धीसाठी अनेक उपाय सांगितले आहेत. वास्तुशास्त्रातील उपाय केल्यास अनेक समस्या दूर होतात. अनेक लोक घराच्या मुख्य दारावर अनेक गोष्टी लावतात. पण वास्तुनुसार तांब्याचे स्वस्तिक लावल्यास अनेक फायदे मिळतात. कोणतेही शुभ कार्य असले की पहिले स्वस्तिक बनवले जाते. शास्त्रामध्ये हे भगवान विष्णूचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे.

नकारात्मकता करते दूर

तांब हा एक पवित्र धातू आहे. त्यापासून बनवलेले स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजावर लावणे शुभ मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते.

यश मिळते

घराच्या मुख्य दारावर तांब्याचे स्वस्तिक लावल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. त्यामुळे सूर्याची उर्जा आकर्षित होते. ज्यामुळे व्यक्तीला समृद्धी आणि यश मिळते.

सदस्यांचे मनं प्रसन्न राहते

घराबाहेर तांब्याचे स्वस्तिक लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. दीर्घकाळ चाललेला कोणताही आजारही निघून जातो. याशिवाय घरातील सदस्यांचे मनही प्रसन्न राहते

वाईट नजरेपासून रक्षण

घराबाहेर तांब्याचे स्वस्तिक लावल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो. स्वस्तिक चिन्ह देखील वाईट शक्तींपासून घराचे रक्षण करते.

कुठे लावावे स्वस्तिक

घराच्या बाहेर योग्य ठिकाणी तांब्याचे स्वस्तिक ठेवणे शुभ असते. त्यामुळे जेव्हाही घराच्या मुख्य दरवाजावर तांब्याचे स्वस्तिक लावले जाते तेव्हा ते दाराच्या वर आणि मध्यभागी ठेवावे. याशिवाय घरामध्ये लावणे देखील शुभ मानले जाते.

योग्य दिशा

घरामध्ये तांब्याचे स्वस्तिक पूर्व दिशेला ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळविण्यासाठी स्वस्तिक ठेवणे शुभ मानले जाते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT