Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर करा 'हे' 5 उपाय, दूर होतील सर्व अडथळे

Vastu Tips: प्रत्येकाचे स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकवेळा रात्रदिवस मेहनत करून देखील त्यांचे स्वप्न पुर्ण होत नाही. अशावेळी वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम फॉलो केले पाहिजे.

Puja Bonkile

vastu tips for buy new dream home get rid all problems

अनेक लोक स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न पाहतात. पण खुप मेहनत करून देखील स्वप्न पुर्ण होत नाही. यामुळे भाड्याच्या घरात राहावे लागेत.

असे अनेक लोक आहेत जे मोठ्या इमारतींमध्ये भाडे देऊन घरात राहतात, परंतु त्यांना स्वतःचे घर बांधता येत नाही. यामागे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार याचे एक कारण कुंडलीतील दोष असू शकते. या दोषामुळे, भरपूर पैसा असूनही, व्यक्ती आयुष्यभर स्वतःचे घर बनवू शकत नाही. हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेक अडथळे येतात.

तुम्हालाही स्वतःचे घर बांधायचे असेल, पण अडथळे येत असतील तर पुढील काही उपाय करून पाहा. यामुळे तुमच्या स्वप्नातील घर पुर्ण होईल.

कडुलिंबाच्या लाकडापासून घर

वास्तूनुसार जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला स्वतःचे घर बनवायचे असेल तर यावर उपाय आहे. या उपायामुळे आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. यासाठी कडुलिंबाच्या लाकडापासून घर बनवून जवळच्या मंदिरात ठेवावे. तुम्ही ते लहान किंवा गरीब मुलाला दान करू शकता. यामुळे स्वतःचे घर बांधण्याच्या स्वप्नातील अडथळे आणि दोष दूर होतील. घराचे स्वप्न पूर्ण होईल.

गूळ आणि गहू अर्पण कराव

तुम्हाला स्वतःचे घर बांधायचे असेल तर समस्या येत असेल तर वास्तूत सांगितलेले उपाय करावे. घरातील तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच मंगळवारी श्री गणेशाच्या मंदिरात जावे. येथे देवाला गूळ आणि गहू अर्पण करावे. तसेच आपल्या इच्छा देवासमोर सांगाव्या. यामुळे घर खरेदी किंवा बांधण्यात येणारे अडथळे दूर होतील.

भगवान गणेशाची पूजा

जर तुम्हाला घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचण येत असेल तर श्रीगणेशाला नियमितपणे लाल रंगाची फुले आणि दुर्वा अर्पण करावी. बुधवारी उपवास करावा आणि देवाची मनोभावे पुजा करावी. त्यामुळे घर बांधताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.

मातीचे घर बनवा आणि दिवा लावा

जे लोक खूप दिवसांपासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असून घर बांधण्याचे आमचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर मातीचे घर बांधावे. रविवारी या घरात दिव्यात तेल टाकून जाळावे. यानंतर थोडा कापूरही जाळावा. असे केल्याने तुमचे घर बांधण्यात येणारे अडथळे लवकरच दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT