Vastu Tips For Bathroom Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Bathroom: बाथरूममधील 'या' 5 वस्तु लगेच काढा बाहेर, कारण...

अनेक लोक बाथरूममध्ये अनेक वस्तु ठेवतात पण त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Puja Bonkile

Vastu Tips For Bathroom: सध्या अनेक लोक घर सजवण्यावर अधिक भर देतात. वेगवेगळ्या डिझाईन आणि पद्धतीने घर सजवतात. बेडरूमपासून ते बाथरूमपर्यंत अनेक गोष्टींनी सजावट केली जाते. पण वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण त्याचा तुमच्या जीवनावर देखील नकारात्मक आणि सकारात्मक परिमाण होतो. त्यामुळे वास्तुनुसार कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेऊ हे जाणून घेऊया.

  • तुटलेला आरसा

वास्तुनुसार तुटलेला आरसा बाथरूममध्ये ठेऊ नका. कारण याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर पडतो. करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे बाथरूममध्ये तुटलेला आरसा ठेऊ नये.

  • रिकामी बादली

बाथरुममध्ये रिकामी बादली ठेवणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते.

  • छोटी हिरवी झाडे

वास्तुनुसार बाथरूममध्ये छोटी हिरवी झाडे ठेवणे अशुभ मानले जाते. कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते.

  • तुटलेला फोटो

बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला फोटो ठेऊ नये. वास्तुनुसार असे फोटो ठेवणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे कुटुंबात सतत वाद होऊ शकतात.

  • खराब नळ

बाथरूममध्ये चुकूनही खराब झालेले नळ किंवा तोट्या ठेऊ नका. कारण यामुळे घराताील सदस्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच आर्थिक समस्या येऊ शकतात.

  • ओले किंवा खराब कापड

बाथरूममध्ये ओले किंवा खराब कापड ठेवणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे सुर्य दोष आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.यामुळे बाथरूम वापरतांना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT