Vastu Tips 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Year 2023: नवीन वर्षात घराच्या मुख्य दारात ठेवा या 6 गोष्टी, घरामध्ये माँ लक्ष्मीची राहिल कृपा

घराच्या दारात काही वस्तू ठेवणे खूप शुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रामध्ये हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित असते. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. वास्तूनुसार घराच्या मुख्य दारावर काही वस्तू ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.

तुम्हालाही नवीन वर्षात देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटापासून दूर राहायचे असेल तर वास्तुशी संबंधित हे उपाय अवश्य करुन पाहा. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी वास्तुच्या या गोष्टी घराच्या दारात ठेवाव्या.

  • नव्या वर्षात घराच्या मुख्य दारात या गोष्टी ठेवाव्या

आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी घरामध्ये वास्तू दोष नसावा. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी घरातील वास्तुदोष दूर करण्याचे उपाय करा. घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

घराच्या (Home) मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला शुभ चिन्ह लावल्याने घरातील सदस्यांना लाभ होतो. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली होते.

सनातन धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर तुळशीचे रोप लावल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते.

प्रत्येक शुभ कार्यात घराच्या मुख्य दरवाजावर बंडनवार बांधला जातो. सनातन धर्मात हे अत्यंत पवित्र मानले जाते. बंडनवार घरामध्ये सौभाग्य आणतात असे मानले जाते. हे लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते. बंडनवारमध्ये आंब्याची किंवा अशोकाची पाने नेहमी वापरावीत.

घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी भगवान शुक्राला प्रसन्न करणे आवश्यक आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुगंधी फुलांची भांडी लावा आणि रोज पाणी घाला. असे केल्याने घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होते.

घरामध्ये सकारात्मक उर्जेसाठी सूर्याची कृपा असणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार सूर्य यंत्र घराच्या मुख्य दारावर लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असे केल्याने घर धन-धान्याने भरले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT