Earphones Health Issues Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Earphones Health Issues: तासंतास ईअरफोन वापरताय? होऊ शकते गंभीरआजार

Earphones Health Issues: आजकाल लोक मोबाईल फोनसोबत हेडफोन आणि इअरफोन्सचाही खूप वापर करू लागले आहेत.

Puja Bonkile

Earphones Health Issues: आजकाल लोक मोबाईल फोनसोबत हेडफोन आणि इअरफोन्सचाही अतिवापर करू लागले आहेत.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तासंतास इअरफोन लावून गाणी ऐकतात किंवा रिल्स बघतात.

पण, तुम्हाला माहिती आहे का की ज्याप्रमाणे लोक तासंतास मोबाईल फोनच्या वापरामुळे अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. त्याचप्रमाणे इअरफोन जास्त वेळ लावल्याने कानांवर गंभीर परिणाम होतात.

यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानात विविध प्रकारचे आवाज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, मायग्रेन आदींसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

इअरफोन कानात जास्त वेळ ठेवणे किती धोकादायक आहे आणि त्यामुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो हे जाणून घेऊया. 

ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब सावध व्हा

अनेक तरुण मंडळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कानात ईअरफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकतात.

याचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि यामुळे ऐकू न येणे, कानात विविध प्रकारचे आवाज येणे, कानात संक्रमण, चक्कर येणे तसेच चिडचिड होऊ शकते.

अशी सुरुवातीची लक्षणे आढळल्यास ईअरफोनचा वापर शक्य तितका कमी करावा. पण जर तुम्हाला त्यांचा वापर करायचा असेल तर तुम्ही मध्ये थोडा ब्रेक घेऊन इयरफोन घालू शकता. गंभीर समस्या असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या असू शकते

ईअरफोनचा सतत वापर करणे देखील तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही, कारण यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. एवढेच नाही तर त्यातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.

यामुळे तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. याशिवाय यामुळे अनेकांना झोपेचा त्रास, निद्रानाश आणि अगदी स्लीप एपनियाचा त्रास होतो.  

ईअरफोनचा जास्त वापर केल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे तणावाची समस्या उद्भवू शकते.

हेडफोन किंवा इअरफोनच्या अतिवापरामुळे भविष्यात जगभरातील सुमारे 100 कोटी लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे बहिरेपणाची समस्या उद्भवू शकते, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. यामुळे तुम्हीही याचा वापर जास्त करत असाल तर वेळीच बंद करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT