त्वचेवरील खाज आणि पुरळपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा 'या' टिप्स Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Skin Tips: त्वचेवरील खाज आणि पुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेवर पुरळ (Rash), खाज (Itching) येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

दैनिक गोमन्तक

पावसाळ्याच्या दिवसात (Rainy day) अनेक लोकांना त्वचेच्या (Skin) आणि केसांच्या (Hair) समस्यां उद्भवतात. विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये या समस्या जास्त दिसतात. पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेवर (Skin) पुरळ (Rash), खाज (Itching) येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात आर्द्रता अधिक जाणवते. यामुळे घाम (Sweat) येऊन शरीरावर जिवाणू वाढून त्वचेला खाज (Itching) सुटते. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात (Market) अनेक उत्पादने (Products) मिळतात. ज्यामुळे खाज येणे (Itching), पुरळ येणे (Rash) यासारख्या समस्या (Problem) कमी होतात. परंतु काही दिवसांनी हा त्रास पुन्हा होण्याची शक्यता असते. म्हणूनच काही घरगुती उपाय केल्यास या समस्यांवर मात करता यते.

* लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबाचे (Lemon)अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. लिंबाचा वापर त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठीसुद्धा केला जातो. तुमच्या त्वचेला जर खाज सुटली असेल तर एका वाटीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबूचा रस मिक्स करावे. हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी त्वचेला लावावे. ५ ते १० मिनिटानंतर स्वच्छ धुवावे. असे केल्यास त्वचेवरील खाज कमी होते.

* चंदन पावडर

चंदन पावडरचे अनके फायदे आहेत. विशेष म्हणजे चंदन पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी तुम्ही बाजारातील चंदन पावडर आणून त्यात गुलाबजल टाकून पेस्ट बनवू शकता. हि पेस्ट खाज आलेल्या भागावर लावल्याने खाज कमी होण्यास मदत मिळते.

* कडुलिंब

कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील पुरळ आणि खाज कमी होण्यास मदत मिळते. यासाठी कडुलिंबाच्या पानांची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर ही तयार पेस्ट खाज आलेल्या भागावर लावावी. यामुळे त्वचेवरील खाज कमी होण्यास मदत मिळते.

* नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये अनेक जीवनसतत्त्वे असतात. तसेच नारळाचे तेल नैसर्गिक औषधी गुंणांनी समृद्ध असते. म्हणून त्वचेलला मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करतात. जर पावसाळ्याच्या दिवसात त्वचेला खाज सुटली असेल तर नारळाच्या तेलाने मसाज करावी. असे केल्याने त्वचेवरील खाज नाहीशी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT