Peppermint Oil Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Peppermint Oil: केसगळती अन् तेलकट त्वचेवर एकच उपाय पेपरमिंट ऑइल

Peppermint Oil: पेपरमिंट तेलाचे काही थेंब मानेवर आणि पायाच्या तळव्यावर लावता येतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Peppermint Oil: आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आरोग्यासाठी आपण अनेक उपाययोजना करत असतो. कधी कधी हे उपाय वैद्यकीय औषोधोउपचारांचे असतात तर कधीकधी आपल्या आजुबाजुला आपल्या घराबाहेरच्या परसात असणाऱ्या बगीच्यात ज्या औषधी वनस्पती असतात, त्यापासून आपल्याला आपल्या समस्यांवर उपाय मिळतो.

आज आपण जाणून घेऊयात अशाच एका वनस्पतीबद्दल जिचे नाव आहे पेपरमिंट. ही पेपरमिंट फक्त एकाच नाही तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांशी निगडीत उपाययोजना करते. पेपरमिंट ऑइल, जे काही त्वचा आणि केसांच्या समस्या देखील बरे करते, घसा खवखवणे, डोकेदुखी, सनबर्न, खाज सुटणे आणि दात समस्यांसाठी देखील हे तेल फायदेशीर मानले जाते.

ओमेगा 3 फॅटी ऍसिड, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जीवनसत्त्वे ए आणि सी, पोटॅशियम, मॅंगनीज आणि तांबे असतात. तेलाचे मुख्य घटक म्हणजे मेन्थॉल आणि मेन्थॉन. त्यात अँटीव्हायरल, अँटीबैक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटिस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव्ह गुणधर्म देखील आहेत.

पेपरमिंट तेलाचे हे आहेत फायदे

1. त्वचेची जळजळ कमी होते. तुमच्या शरीराला खाज सुटत असल्यास पेपरमिंट तेलाचा वापर केला जाऊ शकतो. लॅव्हेंडर ऑइलमध्ये खाज-विरोधी गुणधर्म असल्याने, तुम्ही पेपरमिंट तेल आणि लॅव्हेंडर तेल एकत्र लावल्यास फायदा होऊ शकतो.

2. डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळतो

3. पेपरमिंटमुळे जुनाट जखमा बरे होण्यास मदत होते.

4.पेपरमिंट तेल ताप कमी करण्यासाठी, विशेषतः लहान मुलांमध्ये प्रभावी आहे. थंड होण्याच्या प्रभावामुळे ताप कमी होण्यास मदत होते. औषधाला पर्याय म्हणून पेपरमिंट तेलाचे काही थेंब मानेवर आणि पायाच्या तळव्यावर लावता येतात.

5. पेपरमिंट ऑइल, जे श्वास घेताना स्मरणशक्ती आणि सतर्कता सुधारण्यास मदत करते, शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत होते.

  • केसांसाठी पेपरमिंट तेल

  • पेपरमिंट तेलाने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस आणि टाळूचे पोषण होते.

  •  कोरडे आणि खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी ते प्रभावी आहे .

  • पेपरमिंट ऑइल केस गळतीस प्रतिबंध करते, कोंडा आणि उवांपासून मुक्त होण्यास मदत करते.

  • त्वचेसाठी पेपरमिंट तेल

  • एका प्लास्टिकच्या भांड्यात 3 चमचे टेबल मीठ 2 चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा.

  • मिश्रणात पेपरमिंट तेलाचे 4 थेंब घाला

  • त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी या मिश्रणाने तुमचा ताजा धुतलेला चेहरा हळूवारपणे घासून घ्या.

  • चमकदार आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी दर तीन दिवसांनी ही प्रक्रिया पुन्हा करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT