Glowing Skinसाठी तांदळाच्या पिठाचा करा 'असा' वापर  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Glowing Skinसाठी तांदळाच्या पिठाचा करा 'असा' वापर

दैनिक गोमन्तक

अनेक महिला चेहऱ्यावर(face) महागडे फेशियल (Facials) करतात.तरीसुद्धा त्यांचे चेहरा निस्तेज (Dingy) दिसू लागतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग हरवून बसतो. तसेच मुरूमांची (Pimples) समस्या देखील वाढू लागते. यामुळे अनेक महिला विविध क्रीम किंवा लोशन वापरतात, परंतु चेहऱ्यावरच्या समस्या या वाढत जातात. असे न करता तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. चला तर मग जाणून घेवूया घरगुती फेशियल कसे तयार करायचे.

* क्लींजर करण्यासाठी उपयोग

क्लींजर करण्यापूर्वी प्रथम चेहरा कोणत्याही फेसवॉशने धुवावा. यानंतर एक वाटी तांदळचे पीठ तयार करून घ्यावे. यात पाच चमचे दूध मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यावी. हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. 2 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

* स्क्रब करण्यासाठी उपयोग

तांदळाचा वापर आपण स्क्रब करण्यासतही करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन कमी होण्यास मदत करते. यासाठी एक चमचा कोरफड जेल आणि दूध अर्धा चमचा घालून तांदळाच्या पिठात मिक्स करून पेस्ट तयार करावी. हलक्या हाताने चेहऱ्यावर 2 ते 4 मसाज करावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

* स्टीम करण्यासाठी उपयोगी

चेहऱ्यावर स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर कोरफड जेल लावावे. यानंतर दोन मिनिटे चेहऱ्यावर वाफ घ्यावी. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एक भांड्यात पाणी उकळा आणि चेहरा टॉवेलने झाकून 30 सेकंद वाफ घ्यावी. यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा.

* फेस मास्क बनवण्यासाठी उपयोग

दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चिमूटभर मीठ, अर्धा चमचा कोरफड जेल, अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करून पेस्ट तयार करावी. ही पॅक चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवावे. ही पॅक वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी हे फेशियल आठवड्यातून 2 ते 3 वेळा करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT