Morning Routine Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Routine: सकाळच्या 'या' सवयींमुळे वाढतो लठ्ठपणा...! वेळीच व्हा सावध

Morning Routine News: जर दिवसाची सुरुवातच चुकीची झाली तर संपूर्ण दिवस अस्वस्थ जातो.

दैनिक गोमन्तक

जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदी आणि चांगला जातो. निरोगी (Healthy Life) सकाळची दिनचर्या केवळ तुम्हाला तंदुरुस्त आणि चपळ बनवते. जर दिवसाची सुरुवातच चुकीची झाली तर संपूर्ण दिवस व्यर्थ जातो. तुमच्या अशा अनेक सवयी असताील ज्यामुळे संपूर्ण दिनचर्या बिघडते, यासोबतच त्याचा आपल्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

  • जास्त वेळ झोपणे

निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप (Sleep) खूप महत्त्वाची आहे. रोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्ही बराच वेळ झोपलात तर तुमची दिवसभराची दिनचर्या बिघडते. तुम्ही नाश्ता उशिरा कराल, नंतर जेवण उशिरा कराल, ज्यामुळे तुमच्या चयापचयवर परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले की करते जे लोक 9 ते 10 तास झोपतात त्यां लोकांमध्ये लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते.

  • व्यायाम न करणे

जर तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर सकाळी उठून व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. जरी तुम्ही 10 ते 15 मिनिटे हे केले तरी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी जळते आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होऊ शकते. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर या सर्व गोष्टी करत नसाल तर तुम्ही एक अस्वास्थ्यकर दिनचर्या फॉलो करत असाल तर त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

  • पाणी न पिणे 

सकाळी (Morning) उठल्यानंतर पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही सर्वात मोठी चूक करता. कारण पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापासून कॅलरी बर्न करण्यास मदत करते. पाणी न पिल्याने पचनशक्ती कमकुवत होते.यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. म्हणूनच दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने (water) करणे चांगले.

  • साखरेचा चहा पिणे

अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने करतात. पण जर आपण सकाळी लवकर अति साखर आणि क्रीमयुक्त चहा-कॉफीचे सेवन केले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. क्रीम आणि साखरेने भरलेली कॉफी आणि चहा वजन वाढवण्यास मदत करू शकते.

  • अनहेल्दी पदार्थांचे सेवण टाळणे

न्याहारी अतिशय साधा आणि प्रथिनांनी भरलेला असावा, जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात जंक फूड किंवा जास्त तेलकट मसाले खात असाल तर ते तुम्हाला आणखी चरबीयुक्त बनवू शकते, तुम्हाला दिवसभर सुस्ती येउ शकते.

  • जेवताना टीव्ही पाहणे

सकाळी जेवताना तुम्ही टीव्ही (TV) अजिबात पाहू नये. कारण तुमचे लक्ष टीव्हीवरच राहते आणि तुम्हाला आणखी खाण्याचा मोह होऊ शकतो. तुमचे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT