Typhoid Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Typhoid: उन्हाळ्यात टायफॉइडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे ठरु शकते धोकादायक, लहान मुलांची घ्या विशेष काळजी; जाणून घ्या उपाय

Typhoid Fever In Summer:उन्हाळ्यात टायफॉइड तापाचा धोका वाढतो. टायफॉइड ताप हा साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होणारा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. त्याच्या लक्षणांमध्ये ताप समाविष्ट आहे, जो हळूहळू वाढतो.

Manish Jadhav

उन्हाळ्यात टायफॉइड तापाचा धोका वाढतो. टायफॉइड ताप हा साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे होणारा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. त्याच्या लक्षणांमध्ये ताप समाविष्ट आहे, जो हळूहळू वाढतो. या आजाराची सुरुवातीची लक्षणे ताप, थकवा, डोकेदुखी, पोटदुखी आणि भूक न लागणे आहेत. जर या आजारात निष्काळजीपणा दाखवला गेला तर स्थिती गंभीर होऊ शकते आणि रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. या आजाराने कोणीही ग्रस्त होऊ शकते, परंतु मुलांमध्ये हा धोका जास्त असतो.

आतड्यांचे सर्वात जास्त नुकसान

दरम्यान, उन्हाळ्यात खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळे आणि टायफॉइडच्या रुग्णाकडून संसर्ग झाल्याने हा आजार होऊ शकतो. टायफॉइड तापामुळे आतड्यांचे सर्वात जास्त नुकसान होते. टायफॉइडचे तीन टप्पे असतात आणि तिसरा टप्पा सर्वात गंभीर असतो. तिसऱ्या टप्प्यात, आतड्यांमध्ये छिद्रे तयार होतात आणि त्यातून रक्तस्त्राव सुरु होतो. या परिस्थितीत रुग्णाची स्थिती गंभीर होते. रुग्णाच्या पोटात असह्य वेदना होतात, त्यामुळे टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे दिसताच उपचार सुरु करावेत.

टायफॉइडची मुख्य कारणे

टायफॉइड संसर्गाचे अनेक कारणे आहेत. त्यातही शौचावरुन आल्यानंतर हात व्यवस्थित न धुणे हे याचे एक मुख्य कारण आहे. याशिवाय, दूषित गोष्टींना स्पर्श केल्यानंतर हात न धुता खाणे. दूषित पाणी पिणे, सीफूड व्यवस्थित न शिजवता खाणे. कच्च्या भाज्या खाणे. इत्यादी टायफॉइडची कारणे आहेत. कच्च्या भाज्यांमध्येही बॅक्टेरिया असू शकतात, म्हणून त्या पूर्णपणे शिजवल्यानंतरच खाव्यात. याशिवाय, साल्मोनेला टायफीच्या रुग्णासोबत (Patient) लैंगिक संबंध ठेवणे हे देखील टायफॉइड संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे.

तिसरा टप्पा घातक असतो

या आजाराच्या पहिल्या टप्प्यात, ताप आणि बद्धकोष्ठतेसह सौम्य पोटदुखीचा त्रास होतो. दुसऱ्या टप्प्यात, पोटदुखी वाढते आणि प्रौढ व्यक्तीच्या छातीवर गुलाबी पुरळ उठतात. यासोबतच, तीव्र थकवा आणि मानसिक अस्वास्थ वाटू लागते. मात्र तिसरा टप्पा प्राणघातक ठरु शकतो. तिसऱ्या टप्प्यात, आतड्यांना छिद्रे पडू लागतात आणि पोटदुखी असह्य होऊ शकते. हे बॅक्टेरिया रक्तात प्रवेश करतात, ज्यामुळे सेप्सिस होतो. याशिवाय, दीर्घकाळापर्यंत ताप आणि अतिसारामुळे देखील डिहायड्रेशन होऊ शकते.

टायफॉइड कसा टाळायचा

स्वच्छतेची काळजी घ्यावी. शौच करुन आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. तसेच, जेवणापूर्वीही हात चांगले धुवावेत. स्वच्छ पाणी (Water) प्यावे. जर पाणी दूषित होण्याची शक्यता असेल तर वापरण्यापूर्वी ते गाळून घ्यावे. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. भाज्या नीट धुऊन शिजवाव्यात आणि महत्वाचे म्हणजे लसीकरण करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

Goa Water Supply: '2047 पर्यंत आवश्यक पाण्याची तजवीज 2 वर्षांत करणार', जलसंपदा मंत्री शिरोडकरांचा दावा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT