ATM Card Dainik Gomantak
लाइफस्टाइल

ATM Card: पैसे काढताना एटीएममध्ये कार्ड अडकले तर करा 'हे' एक काम

Types of atm frauds: एटीएममधून पैसे काढताना तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमचे अकाउंट रिकामे करू शकते. हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

types of amt card frauds follow these yip for safety

आजच्या डिजिटल युगात सर्व कामे ऑनलाइन होतात. यूपीआय सुरू झाल्यानंतर, एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली नाही. एटीएममधून पैसे काढताना तुमचा थोडासा निष्काळजीपणा अकाउंट रिकामे होऊ शकते. एटीएम फसवणूक आणि हॅकर्सपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

  • कस्टमर केअरला कॉल करणे

अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात एटीएम मशिनमध्ये लोकांचे कार्ड अडकल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेक वेळा कार्ड मशिनमध्ये अडकते आणि घाबरून आपण तिथे लिहिलेल्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करतो. खरं तर तुमचे कार्ड मशीनमध्ये अडकत नाही तर हॅकर्स कार्ड अडकवतात. ते कार्ड कॅरींग पोर्टमध्ये दुसरे मशीन बसवतात आणि नंतर कस्टमर केअर नंबर म्हणून त्यांचा नंबर पेस्ट केल्यानंतर निघून जातात. नंतर जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा त्यांना फोन करता.नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता. कॉल करण्यापूर्वी, नंबर कोणत्या पद्धतीने लिहिला आहे हे निश्चितपणे तपासावे. कोणत्याही कॉमन पेपरवर नंबर लिहून चिपकवला असेल तर त्यावर कॉल करू नका.

  • मशीन तपासा

एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आणि एटीएमच्या आत जाताच, सर्वात पहिले तुम्हाला ते नीट तपासावे. आजूबाजूला पहा आणि काही हिडन कॅमेरे आहेत का ते तपासावे. तुम्ही एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासू शकता. अनेक वेळा हॅकर्स कार्ड स्लॉट्सभोवती कार्ड रीडर चिप्स बसवतात, ज्यामुळे एटीएम कार्ड डेटा आणि पिन कोडची माहिती चोरली जाऊ शकते.

  • एटीएममध्ये कोणाचीही मदत घेणे टाळा

एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळावे. पैसे काढायला थोडा जास्त वेळ लागला तरी एटीएमजवळ कोणालाही येऊ देऊ नका आणि कार्ड आणि पिन विसरलात तरीही त्यांना सांगू नका.

  • पिन टाकताना घ्या काळजी

तुमचा एटीएम पिन हॅकर्सला मिळाला नाही तर तुमच्या खात्यात प्रवेश करू शकणार नाही. यामुळे एटीएम पिन अतिशय काळजीपूर्वक वापरावे. लक्षात ठेवा की तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला आहात आणि तेथे दुसरी कोणतीही व्यक्ती नसावी. इतर कोणी तेथे उपस्थित असल्यास त्याला बाहेर जाण्यास सांगा किंवा पिन गुप्तपणे टाकावा. पिन टाकताना एटीएम कीबोर्ड आपल्या हाताने झाकून ठेवा आणि शक्य तितक्या मशीनच्या जवळ उभे रहा. जेणेकरून कोणीही तुमचा पिन पाहू शकणार नाही.

  • एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका

घाईगडबडीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपले एटीएम कार्ड आणि पिन आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगतो. पण असे चुकूनही करू नका. सध्या अशा काही घटना उघडकीस येत आहेत ज्यात जवळचे लोकच फसवणूक करतात. तुम्हाला कोणाला एटीएम कार्ड द्यायचे असेल तर ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि ट्रांजेक्शनवर लक्ष द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT