Use of Camphor for Positive Energy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: कापुरासह वापरा 'या' गोष्टी, घरातील सकारात्मक उर्जा वाढण्यास होईल मदत

वास्तुनूसार घरातील सकारात्मक उर्जा वाढवण्यासाठी लवंग वापरू शकता.

Puja Bonkile

Use of Camphor for Positive Energy: घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये ,यासाठी विविध उपाय केले जातात.

वास्तुमध्ये लवंग महत्वाची मानली गेली आहे. देव-देवतांच्या पुजेसाठी लवंग वापरतात. याशिवाय लवंगाचे अनेक उपाय वास्तुमध्ये सांगितलेले आहे.

याचा वापर करून ग्रहांना शांत करता येते. तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर तुम्ही लवंगाशी संबंधित उपाय करू शकता.

वास्तुनुसार घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळल्याने घरातील नाकारत्मक ऊर्जा निगून जाते. तुम्ही अनेक वेळा हवनमध्ये लवंग जाळतांना पाहिले असेल कारण पुजेपुर्वी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते.

वास्तुनुसार जर तुम्हाला धन आणि पैशाची कमतरता जाणवत असेल तर रात्री झोपण्यापुर्वी घरातील चांदीच्या भाड्यांत लवंग आणि कापूर जाळावे.असे केल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. तसेच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता असते.

घरातील सदस्यांमध्ये वाद होत असेल किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर अशा वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या कानाकोपऱ्यात कापराच्या काही गोळ्या ठेवाव्या. यामुळे काही दिवसांनी नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल.

जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा. यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील. रोज संध्याकाळी देवीची कापूरआरती करावी.

  • लवंग जाळण्याचे फायदे

शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते. विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील बॅक्टेरिया दूर ठेवतात आणि घरतातील वातावरण शुद्ध राहण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT