Travel without Visa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Without Visa: प्रवास झाला सोपा! 'या' देशात व्हिसाशिवाय फिरता येणार

Travel Without Visa: तुम्हाला व्हिसासाठी अगोदर अर्ज करण्याची गरज नाही.

दैनिक गोमन्तक

Travel Without Visa: ज्या लोकांना प्रवासाची आवड आहे, ते सगळ्यात आधी त्यांचा पासपोर्ट बनवून घेतात कारण जग फिरण्यात वेगळीच मजा आहे. परंतु जर तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल तर सहसा पासपोर्ट व्यतिरिक्त व्हिसा आवश्यक असतो. त्यामुळे अनेकांना इतर देशांत फिरण्याचा आनंद घेता येत नाही.

पण तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही भारतीय पासपोर्टवर व्हिसाशिवायही जगातील 50 हून अधिक देशांमध्ये प्रवास करू शकता. या देशांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या व्हिसाची गरज भासणार नाही.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारतीय पासपोर्ट धारक व्हिसाशिवाय अनेक देशांमध्ये प्रवेश करू शकतात. या देशांमध्ये अल्बानिया, सर्बिया, बोत्सवाना, इथिओपिया आणि युगांडा या देशांचा समावेश आहे. म्हणजेच या देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला व्हिसासाठी अगोदर अर्ज करण्याची गरज नाही.

याबरोबरच या यादीत मध्य पूर्व देश इराण, जॉर्डन, ओमान आणि कतार हीदेखील नावे आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. आशियाई देशांबद्दल बोलायचे झाले तर कंबोडिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि थायलंड यांचाही या यादीत समावेश होतो.

अलीकडेच भूतान आणि नेपाळनेही भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा ऑन अरायव्हलऐवजी व्हिसा फ्री प्रवासाची संधी दिली आहे. म्हणजेच तुम्ही या देशांसाठी निघताना व्हिसा इंटरव्ह्यूची गरज भासणार नाही, व्हिसा लाइन आणि कागदपत्रांची गरज भासणार नाही.

याशिवाय कझाकिस्तानचे नावही या देशांच्या यादीत समाविष्ट आहे. तुम्ही या देशात 14 दिवसांसाठी व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. यासोबतच समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बार्बादोज आणि फिजीचाही या यादीत समावेश आहे.

भारतीय सेलिब्रिटी अनेकदा मालदीवमध्ये सुट्टीसाठी जातात. जर तुम्हालाही इथे जायचे असेल तर तुम्ही व्हिसाशिवाय जाऊ शकता. जर तुम्हाला आफ्रिकन देशांमध्ये जायचे असेल तर तुम्ही व्हिसाशिवाय मॉरिशस, सेनेगलला भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT