Cotton Buds For Ear: कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स वापरताय? 'हे' नक्की वाचा

Cotton Buds For Ear: यासाठी बेबी ऑइल चांगले मानले जाते.
Ear Wax Cleaning with Buds
Ear Wax Cleaning with BudsDainik Gomantak

Cotton Buds For Ear: आपल्या शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण अनेकविध गोष्टी रोजच्या आयुष्यात करत असतो. त्यामध्ये कानाच्या स्वच्छतेचाही समावेश होतो. पाणी, वारा किंवा धुळीमुळे कानात घाण साचू लागते. याला इअरवॅक्स म्हणतात.

बरेच लोक कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरतात. कॉटन बड्स वापरण्याचा कल शहरी भागात अधिक आहे. पण याने कान स्वच्छ करणे योग्य आहे का? त्यांच्या वापराने खरोखरच कान स्वच्छ होतात की हानी होऊ शकते हे आज आपण जाणून घेऊयात.

कान साफ करण्यासाठी या बड्सचा वापर करणे तुमच्या कानाच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कॉटन बड्स जेव्हा आपण कानात घालतो तेव्हा कानातील मळ बाहेर येण्याऐवजी कानाच्या आत देखील जाण्याची शक्यता आहे.

ज्यामुळे कानाच्या इंनफेक्शनची रिस्क मोठ्या प्रमाणात असते. यामुळे कानात कट लागतात. कॉटन बड्समुळे कानातील पडद्यांनादेखील त्रास होऊ शकतो. कानात रॅशेस निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरदेखील परिणाम होतो.

इयरवॅक्स कानांचे संरक्षण देखील करते, परंतु जर ते जास्त प्रमाणात बनले गेले तर त्यामुळे कानांचे नुकसानदेखील होऊ शकते. लोक कॉटन बड्सने कान स्वच्छ करतात, पण साफसफाई करताना आतली घाण इअर कॅनलमध्येदेखील जाऊ शकते. यासोबतच धोकादायक जीवाणू कानात जाण्याचा धोकाही असतो.

हे बॅक्टेरिया कानाच्या पडद्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. घाण किंवा कोणतेही जीवाणू कानात गेल्यावर अजिबात कळत नाही. काही प्रकरणांमध्ये खाज येते, परंतु लोक त्याकडे लक्ष देत नाहीत.

अशा स्थितीत घाण वाढत राहते ज्यामुळे कानात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशावेळी कॉटन बड्स वापरणे टाळावे. विशेषत: मुले आणि वृद्धांच्या बाबतीत, ते न वापरणे चांगले आहे.

Ear Wax Cleaning with Buds
Foldable Smartphones: पुन्हा येणार फोल्डेबल स्मार्टफोनचा जमाना... 2027 पर्यंत मागणी इतक्या कोटींवर पोहचण्याचा अंदाज

इअरवॅक्स आपोआप बाहेर येतो

आपल्या शरीरात स्वतःला स्वच्छ करण्याची प्रक्रिया असते. या अंतर्गत, कान देखील स्वतःला स्वच्छ करतात. तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी कानातून घाण बाहेर पडायला लागते आणि आतमध्ये असलेला मेण बाहेर पडतो. त्यामुळे दररोज इअरबडने कानातील मळ काढणे गरजेचे नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

कान कसे स्वच्छ करावे

कान स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय म्हणजे त्यात तेल घालणे. यासाठी बेबी ऑइल चांगले मानले जाते. कानात तेल घातल्याने आतील घाण बाहेर येते. ती तुम्ही कापडाच्या मदतीने सहज काढू शकता.

याशिवाय आंघोळ करताना कान स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण आंघोळ करताना थोडेसे पाणी कानात जाते. जे धुळीच्या कणांमध्ये मिसळून घाण करते. अशा परिस्थितीत आंघोळ करताना कान स्वच्छ करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com