Travel Tips
Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: लहान मुलांसोबत फ्लाइटमध्ये प्रवास करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Puja Bonkile

Travel Tips: मुलांसोबत विमानाने प्रवास करणं हे पालकांसाठी मोठे आव्हान असतं. फ्लाइटमधील मर्यादित जागा, अनोळखी लोकांची गर्दी आणि जास्त वेळ एकाच जागी बसण्याची सक्ती यामुळं मुलं अस्वस्थ किंवा कंटाळू शकतात. 

पण थोडी तयारी आणि सावधगिरी बाळगली तर तुम्ही मुलांसोबत विमान प्रवासाचा आनंदही घेऊ शकता. लहान मुलांसोबत विमान प्रवास करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे जाणून घेऊया. 

अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणे


विमानाने प्रवास करताना मुलांच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक त्या वस्तू घेऊन जाणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी, तुमच्याकडे मुलांसाठी आवश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत याची खात्री करा. डायपर, औषधे, बेबी फुड, खेळणी, फराळ इत्यादी सर्व आवश्यक गोष्टी आहेत. यामुळे फ्लाइटमधील मुलांच्या कोणत्याही गरजा त्वरित पूर्ण करता येतील आणि ते प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. 

कानदुखीपासून बचाव


विमानात लहान मुलांसाठी कान दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. याचे कारण म्हणजे उड्डाण करताना जसजशी उंची वाढते तसतसा वातावरणातील दाब कमी होतो. हा दाब कमी झाल्यामुळे कानात वेदना होतात. मूल विमानात चढताच, च्युइंगम किंवा कँडी द्यावी जेणेकरून कान उघडे राहतील. वेदना तीव्र असल्यास, इअर ड्रॉप किंवा लहान मुलांच्या वेदनांचे औषध सोबत ठेवा.

खेळणीसोबत ठेवावे


फ्लाइटमध्ये प्रवास करणे कधीकधी कंटाळवाणे असू शकते. लांबच्या प्रवासात वेळ खूप हळू जातो. म्हणून मुलांसाठी काही सोबत ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचे मनोरंजन होईल. फ्लाइटमध्ये मुलं सोबत असतील तर त्यांची आवडती खेळणी, पुस्तके, छोटे खेळ इत्यादी घेऊन जाऊ शकतात. या गोष्टींमुळे ते व्यस्त राहतील आणि ते बोर होणार नाही. मोबाईल गेम्स देखील उपयुक्त ठरू शकतात. परंतु टेक ऑफ आणि लँडिंग करताना ते बंद केले पाहिजेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT