Travel Dishes| Travel Tips
Travel Dishes| Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Hygiene Tips: लहान मुल जर तुमच्यासोबत प्रवास करत असतील तर 'या' गोष्टी पाळायला विसरू नका

दैनिक गोमन्तक

Travel Hygiene Tips: जेव्हा तुम्ही प्रवास करण्याचा विचार करता तेव्हा मुले तुमच्यासोबत असतील, तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा प्रवास सोपा आणि आंनदी होऊ शकतो.

लहान मुलांसोबत प्रवास करताना अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते, पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. तसेच मदतीने तुम्ही या समस्यांना स्वतःपासून दूर ठेवू शकता. चला जाणून घेऊया लहान मुलांसोबत प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  • प्रवास करतांना मध्ये ब्रेक घ्यावा

जर तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर काही अंतर किंवा काही तासांचा प्रवास केल्यानंतर नक्कीच थोडा वेळ ब्रेक घ्या. अनेकदा लहान मुले एका जागी बांधून बसल्यामुळे अस्वस्थ होतात आणि चिडचिड होऊ लागते. जेव्हा मुलांना सुट्टीच्या वेळी बाहेरची ताजी हवा मिळते, त्यानंतर ते प्रवासासाठी पुन्हा फ्रेश होतील.

  • स्टे करतांना लक्ष ठेवावे

प्रवासादरम्यान जर तुम्ही रात्री कुठेतरी मुक्काम करत असाल तर मुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी अगोदरच पकिंग करून ठेवावा. जेणेकरून तुम्हाला तिथे पोहोचताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही आणि रात्र चांगली जाईल.

  • आहाराची काळजी घ्या

जर मूल ब्रेस्ट फीडिंगवर अवलंबून असेल तर काही हरकत नाही. पण जर त्याने बाटलीतून दूध प्यायले असेल तर चांगल्या दर्जाची काचेची बाटली विकत घ्यावी. यामुळे दूध जास्त काळ गरम आणि ताजे राहील. हे बॅक्टेरियापासून दुधाचे संरक्षण देखील करेल.

  • नॅपी किंवा कपडे ठेवावे

हवामानानुसार मुलांच्या कपड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जर मुलाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा हवामानाची समस्या जाणवत नसेल तर तो आनंदी राहील. मुलांनी फक्त सुती कपडे घालावेत.

  • स्वच्छतेची काळजी घ्या

मुलांच्या स्वच्छतेची सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे त्यांना रोगांचा सर्वाधिक धोका असतो. सॅनिटायझर, अँटीसेप्टिक लिक्विड, साबण यांसारख्या वस्तू सोबत ठेवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT