Travel Food Idea
Travel Food Idea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Food Idea: प्रवासाची मजा होईल द्विगुणित,फक्त सोबत ठेवा 'हे' खाद्यपदार्थ

Puja Bonkile

travel food idea pack these food for traveling

कोरोना काळापासून अनेक लोक प्रवास करतांना खुप काळजी घेतात. संसर्ग टाळण्यासाठी, प्रवास करताना पूर्वीसारखे ढाबे किंवा रेस्टॉरंटमध्ये खाणे अनेक लोक टाळतात. प्रवास करताना घरचे जेवण घेणे पसंत करणारे अनेक लोक आहेत.

प्रवासादरम्यान घरी बनवलेले पदार्थ पॅक करून ठेवतात. लोक प्रवासासाठी घरी बनवलेले अन्न पॅक करतात, पण जेवायला बाहेर काढतात तेव्हा ते खराब होते. दीर्घकाळ टिकणारे खाद्यपदार्थ प्रवास नेणे फायेदशीर असते. हे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया.

गोड पदार्थ

तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्ही प्रवासादरम्यान काही गोड पदार्थ सोबत ठेऊ शकता. जे दूध किंवा माव्यापासून बनवलेल्या नाहीत. तिळाचे लाडू, चिक्की हे सगळे खूप दिवस टिकतात आणि चव जात नाही. तुम्ही पिठाचे लाडू किंवा रव्याचे लाडू बनवून पॅकही करू शकता.


पराठे

भाजीसोबत पराठे किंवा पुरी पॅक करू शकता. पराठा पुरी बनवण्यासाठी पीठ मळताना पाण्याऐवजी दूध वापरावे. यामुळे पराठे खराब होत नाहीत. प्रवासासाठी तुम्ही उडीद किंवा हरभरा डाळ पराठे देखील पॅक करू शकता.

सुका चिवडा

तुम्ही प्रवासाला जात असाल तर तुम्ही तळलेला कोरडा चिवडा नाश्त्यासाठी पॅक करू शकता. त्यात शेंगदाणे, मीठ वगैरे टाकून लागलेली छोटीशी भूक कमी करू शकता. तुम्ही मथरी, भाजलेली हरभरा डाळ, बिस्किटे, खाखरा इत्यादी गोष्टी देखील पॅक करू शकता.

सुक्या भाज्या

जर प्रवास लांबचा असेल तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी ग्रेव्ही असलेली भाजी न वापरता कोरड्या भाज्या पॅक कराव्या. तुम्ही बटाटा,भेंडी यासारख्या भाज्या घेऊन जाऊ शकता. कोरडी भाजी शिजवताना त्यात पाणी घालू नका हे लक्षात ठेवा. तेलाचे प्रमाणही जास्त ठेवा. यामुळे भाजी जास्त दिवस खराब होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT