Use strawberries for skin care
Use strawberries for skin care  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: त्वचेची काळजी घेण्यासाठी करा स्ट्रॉबेरीचा "असा" वापर

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips: फळांमध्ये त्वचेच्या (Skin) काळजीसाठी खूप फायदेशीर असतात. तसेच आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता. तसेच मास्क(Mask) , स्क्रब (Scrub) आणि फेशियल दरम्यान वेगवेगळ्या त्वचेच्या प्रकारात याचा वापर करता येतो. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी (Food) स्वादिष्ट असते. आपण या फळाचा नियमित वापर केल्याने त्वचेला चमकदार बनविण्यास मदत मिळते. जाणून घेऊया घरगुती उपचाराबद्दल जाणून घेऊया. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य (Beauty) टिकून राहण्यासाठी मदत मिळते.

* त्वचा चमकण्यास मदत

सौंदर्यशास्त्रज्ञांच्या मते, स्ट्रॉबेरीचा (Strawberries) रस त्वचेचा रंग बदलण्यास मदत करतो. तसेच मुरूम आणि डाग कमी करण्यासाठी मदत मिळते. यासाठी आपल्याला स्ट्रॉबेरी चांगले बारीक करावे आणि त्याचा रस काढावा लागतो. हा रस पूर्ण चेहऱ्यावर लावावा. हा रस चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवावा. नंतर थंड पाण्याने धुवावा. याचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करावा. सूर्याच्या हानिकारक किरणापासून संरक्षण करने तसेच टॅनिंगपासून देखील बचाव करते.

* मुरूमापासून सुटका

स्ट्रॉबेरीच्या (Strawberries) रासमुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत मिळते. यासाठी अर्धी स्ट्रॉबेरी मालाई मध्ये मिक्स करावी. ही पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवावे. यात क्लींजिंग गुणधर्म असतात. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते. आपण नियमितपणे असे केल्यास चेहऱ्यावरी मुरुमांचा त्रास कमी होतो. तसेच तुम्ही स्ट्रॉबेरी असलेले फेस वॉश वापरू शकता.

* टोनर

स्ट्रॉबेरीचा (Strawberries) टोनर वापरल्याने चेहऱ्यावर जातेपणा टिकून राहतो. यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी रस काढावा. प्रत्येक 100 ग्रॅम गुलाब पाण्यात 2 चमचे रस मिक्स करावा. रात्री झोपण्यापूर्वी ही मिश्रण कापसाच्या मदतीने लावावे. हा घरगुती स्कीन टोन त्वचेचा कोणताही प्रकार असला तरी वापरता येतो. परंतु नाइट क्रीमसोबत ही टोनर वापरणे टाळावे. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. चमकदार त्वचा हवी असेल तर ही टोनर नियमितपणे वापरा.

* स्ट्रॉबेरी मिल्क

स्ट्रॉबेरी (Strawberries) आणि दूध ही दोन्ही पदार्थ आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. स्ट्रॉबेरी मिल्क तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी 3 ते 4 घ्यावी. यात 7 चमचे दूध घालावे. याचे चांगले मिश्रण तयार करावे. सकाळी याचे पॅक चेहऱ्याला लावावे. ही पॅक लावल्यावर तुमची त्वचा निस्तेज होण्यापासून बचाव करते.

* स्ट्रॉबेरी स्क्रब

स्ट्रॉबेरीचा (Strawberries) स्क्रब वापरल्याने चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत मिळते. ही स्क्रब तुम्ही घरीच तयार करू शकता. यासाठी 5 ते 6 स्ट्रॉबेरी चांगले मिक्स करावे. यात 2 चमचे मध घालावे. नंतर यात यहोडे गरम पाण्याचे थेंब घालावे. ही मिश्रण चेहऱ्यावर 10 मिनिटे ठेवावे. नंतर हलक्या हाताने मसाज करावी. असे आठवड्यातून 3 वेळा केल्यास तुमची त्वचा चमकदार होऊन तुम्ही अधिक तरुण दिसाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT