Thyroid Dysfunction In Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Thyroid Dysfunction In Pregnancy: गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये का वाढते थायरॉईडची पातळी? जाणून घ्या नियंत्रित कशी करावी

Pregnancy Health Issues: गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेदरम्यान मधुमेहापासून ते लठ्ठपणापर्यंतच्या समस्या उद्भवतात.

Manish Jadhav

Thyroid Issues During Pregnancy Causes and Effects

गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेदरम्यान मधुमेहापासून ते लठ्ठपणापर्यंतच्या समस्या उद्भवतात. गर्भधारणेदरम्यान अनेक महिलांमध्ये थायरॉईडची समस्या देखील दिसून येते. गर्भधारणेदरम्यान ही समस्या का उद्भवते आणि बाळाच्या जन्मानंतरही ती कायम राहते का? गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये थायरॉईडची पातळी वाढणे याला 'थायरॉईड डिसफंक्शन' म्हणतात. गरोदरपणात हार्मोनल बदलांमुळे ही समस्या उद्भवते.

स्टिमुलेटिंग हार्मोनची पातळी वाढू शकते

गर्भधारणेदरम्यान थायरॉईड स्टिमुलेटिंग हार्मोन (TSH) ची पातळी वाढू शकते. काही महिलांना गरोदरपणात आयोडीनची कमतरता जाणवते. थायरॉईड हार्मोन्ससाठी आयोडीन आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आयोडीन न मिळाल्याने थायरॉइड डिसफंक्शनची समस्या उद्धभवते. यामुळे महिलांमध्ये (Womens) वजन वाढू शकते. थायरॉईडच्या बिघाडामुळे काही महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

बाळाच्या जन्मानंतरही हा आजार कायम राहू शकतो का?

गर्भधारणेदरम्यान थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त असलेल्या महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की, बाळाच्या जन्मानंतरही ही समस्या कायम राहते का? या प्रश्नाच्या उत्तरात, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या डॉ. सलोनी चड्ढा यांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान थायरॉईडची पातळी वाढते, परंतु ही पातळी नेहमीच वाढते असे काही नाही.

बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या हार्मोनची पातळी सुधारते

बाळाच्या जन्मानंतर महिलेची हार्मोनची पातळी सुधारते आणि थायरॉईड देखील नियंत्रित राहते. पण यासाठी गर्भधारणेनंतर आहाराची काळजी घेणे महत्त्वाचे असते. यादरम्यान महिलांनी मानसिक ताण घेऊ नये. तसेच, प्रसूती सामान्य झाली तर डॉक्टरांच्या (Doctors) सल्ल्यानुसार काही काळानंतर व्यायाम सुरु करावा.

थायरॉइड डिसफंक्शन कंट्रोल करण्याचे पर्याय

गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी करुन थायरॉइड डिसफंक्शनबाबत कळते.

आयोडीनचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आयोडीनयुक्त मीठ खावे.

मानसिक ताण घेऊ नये

महिलांनी आहाराची काळजी घ्यावी.

आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समाविष्ट करावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Crime: 'पोलिस नक्की कुणाला संरक्षण देतात'? मोरजी खून प्रकरण; आप, कूळ-मुंडकार मुख्य संशयिताच्या अटकेसाठी आक्रमक

Edberg Pereira Case: 'एडबर्ग' मारहाण प्रकरणाचे गूढ वाढले! शिस्तभगांची कारवाई झालेला हवालदार आजारी सुट्टीवर; चर्चांना उधाण

मटका म्हणजे काय? पुराव्यांअभावी मडगाव कोर्टाकडून संशयिताची निर्दोष सुटका

Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

Goa Today's News Live: कचरा कामगार वेतन घोटाळा! सांताक्रूझ ग्रामपंचायतीचा सरकारी सेवक आणि पंच सदस्याविरुद्ध ACB कडून FIR दाखल

SCROLL FOR NEXT