Pregnancy Tips: गर्भधारणेसाठी डॉक्टरांनी सुचवलेली 'ही' आयुर्वेदिक औषधं घ्या

Sameer Amunekar

गर्भधारणेसाठी अनेक स्त्रिया विविध उपाय आणि उपचार घेत असतात. डॉक्टरांकडून सुचवलेली औषधं घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.

Pregnancy Tips | Dainik Gomantak

धायटीची फुले

आयुर्वेदात स्त्रियांच्या प्रजननक्षमतेसाठी विविध वनस्पती आणि औषधी संयुगे प्रभावी मानली जातात. धायटीची फुले आणि निळे कमळ यांचे चूर्ण मधासह घेतल्यास गर्भधारणेस मदत होते, असे मानले जाते.

Pregnancy Tips | Dainik Gomantak

आवळा, वेखंड व बला

आयुर्वेदात स्त्रियांच्या प्रजननक्षमतेसाठी काही विशिष्ट वनस्पती आणि औषधी संयुगे उपयुक्त मानली जातात. आवळा, वेखंड आणि बला या तीन वनस्पतींचे समभाग चूर्ण दुधासोबत सेवन केल्यास गर्भधारणेस अनुकूल वातावरण तयार होते.

Pregnancy Tips | Dainik Gomantak

महाळुंग

महाळुंगाच्या मुळाचा संस्कार करून बनवलेल्या सिद्ध केलेले घृत (औषधी तूप) आयुर्वेदात विशेष महत्त्वाचे मानले जाते. आयुर्वेदात असे मानले जाते की, योग्य पद्धतीने तयार केलेले आणि सेवन केलेले हे घृत स्त्रियांच्या प्रजननक्षमतेसाठी फायदेशीर ठरू शकते.

Pregnancy Tips | Dainik Gomantak

वडाचे कोवळे अंकुर

आयुर्वेदात वडाच्या औषधी गुणधर्मांचे मोठे महत्त्व आहे. वडाच्या कोवळ्या अंकुरांचे तुपासह सेवन केल्यास स्त्रियांच्या प्रजननक्षमतेस चालना मिळते आणि गर्भधारणेस मदत होते

Pregnancy Tips | Dainik Gomantak

अश्वगंधा

आयुर्वेदात अश्वगंधा प्रजननक्षमतेसाठी अतिशय प्रभावी मानली जाते. अश्वगंधा काढ्यासह सिद्ध केलेले तूप पाळीनंतर सेवन केल्यास गर्भधारणेस मदत होते. वरील सर्व आयुर्वेदिक औषधं डॅा. श्री बालाजी तांबे यांच्या 'फॅमिली डॉक्टर संग्रहातील 'स्त्रीआरोग्य' या पुस्तकात नमूद करण्यात आली आहेत.

Pregnancy Tips | Dainik Gomantak
Summer Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा