Gudi Padwa 2023 Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gudi Padwa Special: मराठमोळा लुक हवाय? मग हा पारंपारिक साज हवाच

हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी खास मराठमोळा लुकमुळे सौंदर्यात भर पडते.

दैनिक गोमन्तक

Maharashtrian Jewellery for Gudi Padwa 2023: गुडीपाडव्यापासून हिंदू नव वर्ष मोठ्या आनंदात साजरा केला जातो. उद्यावर आलेल्या या सणासाठी महिला खास तयारी करतात.

पारंपारिक महाराष्ट्रीय पोषाखासोबत पारंपारिक दागिने तुम्हाला परफेक्ट लुक देऊ शकतात. साडी असो वा नऊवारी हे पारंपारिक दागिने तुमच्यावर खुलून दिसतील. या दागिन्यांशिवाय तुमचा महाराष्ट्रीय लुक अपूर्ण आहे.

  • ठुशी

गळ्याभोवती घातला जाणारा हा दागिना आता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. बारीक मण्यांची गुंफण करुन तयार केलेल्या या दागिन्यात पाचू, माणिक, रत्न यासारखे खडे सुद्धा जोडले जातात. नवीन डिझाईनमध्ये यात पेंडंट सुद्धा जोडले जाते. ऑक्सिडाईज प्रकारातील ठुशी देखील ट्रेंड मध्ये आहे.

  • बोरमाळ

दोन किंवा तीन पदरी बोरमाळ काठापदराच्या साडीवर खुलून दिसतात. बोराच्या आकारातील लहान आणि मोठे मणी असलेली बोरमाळ ऑक्सिडाईज्ड प्रकारातही खुलून दिसते.

  • बुगडी

महाराष्ट्राची विशेषता असणारी बुगडी पारंपारिक झुमक्यांसोबत कानाच्या वर घालू शकता. डिझाईनच्या बाबतीत यातही अनेक प्रकार पहायला मिळतात. मोत्यांप्रमाणेच आता डायमंडच्या बुगडी सुद्धा ट्रेंडमध्ये आहेत

  • राणीहार

एक, दोन किंवा तीन पदरी राणी हार घातल्याने पूर्ण गळा भरल्यासारखा दिसतो. बाजारात मिळणाऱ्या याच्या एका पेक्षा एक सुंदर अशा डिझाईन वेड लावतात.

  • तन्मणी

हे लांब आकारातील मोत्याचे हार चिंचपेटी सोबत घालू शकता. वेगवेगळ्या डिझाईन मधील तन्मणी काठापदराच्या साडीवर खुलून दिसते.

  • पिचोडी

बांगड्यातील हा प्रकार एक उत्तम ऑप्शन आहे. एका बाजूने प्लेन आणि एका बाजूने सुंदर नक्षीकाम असणाऱ्या या बांगड्या कांचेच्या बांगड्यांसोबत शोभून दिसतात.

  • नथ

याशिवाय महाराष्ट्रीयन साज पूर्णच होऊ शकत नाही. पारंपारिक मोत्यांची नथ विविध आकारात मिळतात. आजकाल डायमंड आणि ऑक्सिडाइजच्या वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा उठून दिसतात.

  • कोल्हापुरी साज

साडी किंवा नऊवारी सोबत हा एकच दागिना उठून दिसायला पुरेसा आहे. सोन्याप्रमाणेच ऑक्सिडाईज कोल्हापूरी साज पसंतीस उतरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT