Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराच्या दक्षिण दिशेला कोणत्या वस्तू ठेवणे अशुभ ? जाणून घ्या, योग्य नियम

Vastu Tips: 'या' वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips: वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू वास्तु नियमानुसार ठेवणे शुभ असते. गोष्टी चुकीच्या दिशेने ठेवल्याने नकारात्मकता वाढते आणि तणावाचे वातावरण घरात निर्माण होते. गेल्या काही वर्षांत वास्तुशास्त्राचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

घरापासून ऑफिस, दुकानापर्यंत सर्व ठिकाणचे वास्तुशास्त्र लोकांकडून पाहिले जाते, त्यामुळे सुख, शांती टिकून राहण्यास मदत होते.

  • मशीन

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. इलेक्ट्रॉनिक वस्तू दक्षिण दिशेला ठेवल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. घरगुती भांडण वाढते.

Machine
  • देवघर

घराच्या दक्षिण दिशेला देवघर किंवा मंदिर (Temple) नसावे. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा आणि पितृ दिशाही आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला पूजा करणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने घरावर वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. नकारात्मक ऊर्जा वाहू लागते.

Home Temple
  • बेडरूम

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला बेडरूम असणे शुभ मानले जात नाही. बेड दक्षिण दिशेला असल्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात. नवरा-बायकोमध्ये मतभेद होत राहतात.

Bed Room
  • चप्पल

वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण यामुळे पितृदोष निर्माण होतो. तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. यासोबतच शांती, सुख-समृद्धीही घरातून दूर जाऊ शकते.

Shoes
  • स्टोअर रूम

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला स्टोअर रूम अशुभ मानली जाते. घराच्या दक्षिण दिशेला स्टोअर रूम असल्‍याने घरातील माणसांमध्ये आपलेपणा कमी होतो, त्‍यामुळे कुटुंबातील (Family) लोकांमध्ये सुसंवाद राहत नाही.

Store Room

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

Arpora Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; फरार सचिव रघुवीर बागकर अखेर गजाआड! हणजूण पोलिसांची कोलवाळेत कारवाई

Russian Woman Murder: 1 नाही, 2 रशियन महिलांचा खून! नाव-वय सारखे असल्याने वाढला गोंधळ; संशयित आरोपीच्या कबुलीने गोव्यात खळबळ

Goa Latest Updates: Bicholim: डिचोलीत दोन दुचाकींमध्ये समोरासमोर टक्कर; महिला गंभीर जखमी

Gold Price Today: सोन्याबाबत महत्वाची बातमी! जागतिक घडामोडींचा थेट परिणाम; काय आहेत आजचे दर? जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT