Dangers of drinking unnecessary water
Dangers of drinking unnecessary water Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: गरजेव्यतिरिक्त पाणी प्यायल्यामुळे होतात 'हे' दुष्परिणाम

Ganeshprasad Gogate

पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. मात्र गरज नसताना पाणी प्यायल्यामुळे किंवा चुकीच्या वेळेस पाणी प्यायल्याने त्याचा उपयोग होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पाणी पिताना काही गोष्टींची, विशेषत: पाणी कधी पिऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

निरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात आणि ती म्हणजे, अमूक लिटर, अमूक इतके ग्लास पाणी दिवसभरात संपवलंच पाहिजे हा विचित्र नियम पाळणं.

आपलं शरीर म्हणजे एक चमत्कारिक यंत्रच आहे. त्याच्या गरजा ते योग्यवेळी व्यक्त करतं आणि तितकीच ती भागवतंही. भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. अनेकजण उगाचंच तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी पितच राहतात. हे शरीराच्या रचनेविरूध्द आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की घशाला कोरड पडेपर्यंत वाट बघावी. चुकीच्या वेळी पाणी पिणं आणि पाण्याच्या अतीसेवनानं शरीरातल्या मिठाचं अर्थात सोडीयमचं संतुलन बिघडतं. यामुळे कधी कधी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

  •  झोपण्यापूर्वी-

    अनेकांना झोपण्यापूर्वी पाणी, ग्रीन टी, चहा, कॉफी असं काहीतरी पिण्याची सवय असते. मात्र झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी पोटात कुठलाही द्रवपदार्थ जाऊ देऊ नये. जास्त वेळा लघवीला जाण्याच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी अर्धा तास पोट रिकामं असावं. यामुळे झोपही शांत लागते. दिवसाच्या तुलनेत रात्री आपल्या किडण्या मंदपणे काम करत असतात. याच कारणामुळे सकाळी उठल्यावर बरेचदा चेहरा सुजलेला दिसतो. त्यात जर झोपण्यापूर्वी पाणी प्यायलं तर ही सूज वाढण्याची शक्यता असते.

  •  सकाळी रिकाम्यापोटी-

    अनेकांचा असा समज असतो की सकाळी उठल्यावर अनुशापोटी म्हणजे पोट रिकामं असताना भरपूर पाणी प्यावं. हे अगदी चूक आहे. अनुशापोटी पाणी पिणं लाभकारक असलं तरीही लिटरच्या लिटर पाणी पिणं असा त्याचा अर्थ नाही. तसेच गार पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायलं तर आरोग्याच्या दृष्टिनं ते जास्त लाभकारक ठरेल.

  •  लघवीला रंग नसेल तर-

    आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत की नाही? याची सोपी टेस्ट म्हणजे, लघवीचा रंग तपासणे. जर तो फिका पिवळट असेल तर आपण योग्य प्रमाणात पाणी पित आहोत.

    जर लघवीला रंगच नसेल आणि ती पाण्यासारखीच पारदर्शक असेल, तर मात्र पाण्याचं अतिरिक्त सेवन होत आहे. अर्थात हे सातत्याने होणं योग्य नाही. असं होत असेल, तर पाणी कमी प्यावं. पाण्याच्या अतिसेवनामुळे सोडियमची कमतरता जाणवू लागते आणि कधी कधी ह्रदविकाराचा झटका येण्याची शक्यताही असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

SCROLL FOR NEXT