Dry Coconut Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Coconut: 'या' समस्या असलेल्या लोकांनी सुकं खोबरं खाणे टाळावे

सुक्या खोबऱ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक मजबुत होते. पण काही लोकांनी हे खाणे टाळावे.

Puja Bonkile

Dry Coconut: सुक्या खोबऱ्याचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. खोबर खायला खूप चवदार असते. सुक्या खोबऱ्याचा वापर केल्यास पदार्थाची चव तर वाढतेच आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. सुकं खोबर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच इतर अनेक आजारही दूर होतात.

सुक्या खोबऱ्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज, सेलेनियम, तांबे, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. याशिवाय सुक्या खोबऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील असते. पण सुकं खोबरं खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत.

  • सुकं खोबरं कोणी खाऊ नये

वजन वाढते

सुकं खोबरं जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी खोबऱ्याचे सेवन टाळावे.

पोटाचे आजार

सुकं खोबरं जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्ही याचे अति सेवन केल्यास उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.

मधुमेह

सुक्या खोबऱ्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक मानले जाते. कारण खोबऱ्यात भरपूर साखर असते. त्यामुळे याचे सेवन केल्याने साखरेची पातळी वाढू शकते.

  • फायदे कोणते

रोगप्रतिकारशक्ती वाढचे

सुकं खोबरं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. कारण सुक्या खोबऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे जर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे सेवन केले तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन होणार नाही.

हृदयाचे आरोग्य

सुक्या खोबऱ्याचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सुकं खोबरं रोज खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. तसेच, सुक्या खोबऱ्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण चांगले राखण्यास मदत करते. 

रक्ताची कमतरता दूर

सुक्या खोबऱ्याचे सेवन केल्याने अॅनिमियाच्या समस्येपासून आराम मिळतो. कारण सुक्या खोबऱ्यात लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे सुक्या खोबऱ्याचे सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

कर्करोग

सुक्या खोबऱ्याचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या घातक आजाराचा धोका कमी होतो. कारण सुक्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. म्हणूनच जर तुम्ही याचे सेवन केले तर ते स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

Horoscope: आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तुमच्या राशीचे भविष्य!

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

SCROLL FOR NEXT