हिवाळा असो किंवा उन्हाळा घरामध्ये फ्रीज योग्यरित्या कार्य करणे फार महत्वाचे आहे. वेळोवेळी आपण फ्रीजची (Fridge) काळजी घेत राहतो. पण तो बराच काळ व्यवस्थित ठेवणे फार महत्वाचे आहे कारण आजकाल फ्रीज (Fridge) खूप महाग झाले आहेत. यामुळे फ्रीजची काळजी (Care) घेणे आवश्यक आहे. फ्रीज खराब होण्यामागे अनेक करणे असू शकतात. जसे की कॉम्प्रेसर बिघाड, वायरिंगची समस्या यासारख्या इतर समस्यांमुळे फ्रीज (Fridge) लवकर खराब होऊ शकते. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या कोणत्या फ्रीजची कशी काळजी घ्यावी.
1) अनेक वेळा फ्रीजमध्ये समान ठेवताना, पदार्थ खाली पडतात. तेव्हा लगेच स्वच्छ करुन घ्यावे. अन्याथा फ्रीजमध्ये बुरशी येवू शकते. ही बुरशी फ्रीजमध्ये अनेक भागांमध्ये आढळू शकते. जे फ्रिजमधील अनेक भाग जसे फ्रीजचा दरवाजे, शेल्फच्या कडा आणि आतील भाग तसेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तुसह खराब करू शकतात. फ्रीज स्वच्छ आणि आदजहिक काळ टिकण्यासाठी आठवड्यातून एकदा साफसफाई केली पाहिजे .
2) फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवल्या जातात. यामुळे फ्रीजमध्ये खूप समान भरलेले दिसते. ते समान व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. अनेक लोक फ्रीजमध्ये समान व्यवस्थित ठेवत नाहीत. यामुळे त्यांना फ्रीजमधून समान काढताना अडचणी निर्माण होतात. यामुळे फ्रीजमध्ये जास्तीचे समान ठेवणे टाळावे. आवश्यक तेवढेच समान ठेवल्यास तुम्हाला फ्रीजमधील समान काढणे सोईस्कर होईल.
3) कोणत्याही पार्टीनंतर अनेक पदार्थ हे उरतात. तेव्हा आपण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो. पण पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तापमान तपासणे महत्वाचे आहे. पदार्थ जर गरम असेल तर फ्रीजमध्ये ठेवू नका, ते लवकर खराब होऊ शकते.
4) कधीकधी फ्रीजमध्ये खूप समान ठेवल्यास फ्रीजचा दरवाजा बंद होत नाही. यामुळे सुद्धा फ्रीज लवकर खराब होऊ शकते. फ्रीजचा दरवाजा व्यवस्थित बंद आहे की नाही यांची तपासणी करणे आवश्यक आहे. या प्रकारे फ्रीजची काळजी घेतल्यास तुमचा फ्रीज अधिक काळ टिकू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.