अंबाडा,गजरा, वेणी आणि बरंच काही Dainik Gomantak
लाइफस्टाइल

अंबाडा,गजरा, वेणी आणि बरंच काही

देवीला वेणी किंवा गजरे वाहण्याची खूप जुनी प्रथा गोव्यात आहे.

दैनिक गोमन्तक

सण (Festival), समारंभ, उत्सव, महोत्सव, लग्न (Marriage) अगदी कोणत्याही सोहळ्यात स्त्रियांना मोहक करणारी बाब म्हणजे वेणी. गजरा किंवा अंबाड्याच्या रूपातही केसात वाहिले जातात. या वेणीचे अनेक प्रकार आहेत. अर्थात वेणी बनवणे हे मोठे कौशल्य (Skills) असते आणि निवडक महिलांना ते जमते. यासाठी दोरा तर देवीला वाहण्यासाठी केळीच्या सोपटाचा वापर केला जातो.

गोव्यात देवदेवता आणि त्यांच्या अलंकार यांचे एक मोठी परंपरा आहे. देवीला वेणी किंवा गजरे वाहण्याची खूप जुनी प्रथा गोव्यात आहे. हे गजरे जसे देवीला वाहतात तसे मुली, स्त्रिया आपल्या वेणीत घालतात. तो सौंदर्याचा सुंदर आविष्कारही आहे. प्रामुख्याने वेणी पांढऱ्या जाई, जुई, कुंदा, मोगऱ्याची असते. अबोली, कोरंटी, बकुळीच्या पण वेण्या विणल्या जातात.

याशिवाय शेवंती, निशिगंधाचे सुंदर अंबाडे बनवले जातात आणि लग्न सोहळ्यात यांना विशेष स्थान आहे. सुरंगीच्या दिवसात सुरंगीच्या वेणीचे तर मोठे आकर्षण असते. गोव्यातल्या सुवासिक जायांच्या वेण्या तर केसात माळण्यापेक्षा जवळ बाळगणे हाच मुळी कुपीतील आणि अंतरातील अत्तराचा भास वाटतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT