Cancer in India: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cancer in India: भारतात वाढणार कॅन्सरचा प्रादुर्भाव; 'ही' आहेत कारणे...

'आयसीएमआर'ने दिला इशारा

Akshay Nirmale

Cancer in India: गेल्या काही वर्षांत देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तथापि, आगामी काही वर्षातही देशातील कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केला आहे.

आयसीएमआरने म्हटले आहे की, 2025 पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 12.7 टक्के वाढ होऊ शकते. धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान, लठ्ठपणा, पोषक तत्वांचा अभाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही कारणे कॅन्सरवाढीमागे असणार आहेत.

भारतातील परिस्थिती चिंताजनक

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मते, 2020 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कॅन्सरचे अंदाजे प्रकरण 13.92 लाख (सुमारे 14 लाख) होते, जे 2021 मध्ये वाढून 14.26 लाख झाले. 2022 मध्ये वाढून 14.61 लाखांपर्यंत पोहोचला होता.

रोग पसरण्याची प्रमुख कारणे

तज्ज्ञांच्या मते, देशात केवळ हृदयविकार आणि श्वसनाचे आजारच नाही तर कॅन्सरचे रुग्णही वाढत आहेत. कॅन्सरच्या वाढत्या प्रादुर्भावाला अनेक घटक कारणीभूत आहेत. यात वाढते वय, जीवनशैलीतील बदल, व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहाराचा अभाव यांचा समावेश आहे.

बर्‍याच वेळा लोकांना कॅन्सरच्या लक्षणांबद्दल संपूर्ण माहिती नसते, त्यामुळे हा आजार वेळेत ओळखला जात नाही आणि उपचारालाही उशीर होतो. लवकर उपचार न मिळाल्याने कॅन्सर वाढतच जातो. म्हणूनच लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवणे देखील खूप महत्वाचे आहे.

गेल्या काही वर्षांत भारतातील पुरुषांमध्ये तोंडाचा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, महिलांमध्ये सर्वाधिक प्रकरणे स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची होती.

बंगलोरस्थित ICMR नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) च्या मते, 2015 ते 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या आकडेवारीत सुमारे 24.7 टक्के वाढ झाली आहे. 14 वर्षांखालील मुलांना लिम्फॉइड ल्युकेमिया, रक्ताशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. कर्करोग टाळण्यासाठी त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

हा भयंकर आजार कसा टाळायचा

“वृद्धत्व, कौटुंबिक इतिहास, अनुवांशिकता, लठ्ठपणा, तंबाखूचा वापर, मद्यपान, मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) सारखे विषाणूजन्य संक्रमण, वातावरणातील रसायने, प्रदूषण, हानिकारक अतिनील किरणांचा संपर्क, खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही हार्मोन्स आणि बॅक्टेरिया ही या भयानक आजाराच्या प्रसाराची कारणे आहेत.

हा आजार टाळण्यासाठी कर्करोगाची लक्षणे दिसू लागताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. भारतातील पुरुषांमध्ये मुख, फुफ्फुस, डोके आणि प्रोस्टेटिक कर्करोग हे सर्वात सामान्य कर्करोग आहेत, तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वात सामान्य आहे.

कर्करोग टाळण्यासाठी लोकांनी तंबाखू आणि दारूपासून दूर राहावे. संतुलित आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. हिपॅटायटीस बी, मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) साठी लसीकरण करा. नियमित तपासणी आणि प्रदूषणापासून दूर राहणे देखील महत्त्वाचे आहे.

जर एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक इतिहासात हा आजार असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब तपासणी करून घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT